Crime News : मोठी बातमी! कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी 'ससून'मधून पळाला!

Swati Mohol :लीलाकर याला शुक्रवारी (ता.9) सोशल मीडियावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती.
Crime News
Crime Newssarkarnama

Pune News : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत आरोपीने ससून रुग्णालयतून पळ काढल्याने पोलिस दलात खळबळ निर्माण झाली आहे. मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव आहे. लीलाकरला पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच अटक केली होती.

Crime News
Parth Pawar: पार्थ पवार दोन तासांत फैसला करणार: मावळ की शिरुरमधून लोकसभेत एन्ट्री करणार?

आरोपी लीलाकर याला रविवारी सकाळी छातीत दुखत असल्याने ससून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. पण उपचारादरम्यान ससून हॉस्पिटल ओपीडीमधून तो सकाळी आठच्या सुमारास पळून गेला. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे. लीलाकरच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके रवाना करण्यात आली आहेत.

सोशल मीडियावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकवले होते. त्यानंतर लीलाकर याला शुक्रवारी (ता.9) पोलिसांनी अटक करत त्याची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली होती. रविवारी पहाटे येरवडा जेलमध्ये त्याची प्रकृती खालावल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तेथे त्याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला

Crime News
Nanded Lok Sabha: दाजी-मेहुण्याची जोडी महाविकास आघाडीसाठी गेम चेंजर ठरणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com