Talegaon Dabhade Nagar Parishad:  Sarkarnama
प्रशासन

Vijayakumar Sarnaik: तळेगाव नगरपरिषदेच्या सीईओ बदलीत नवा ट्विस्ट; मॅटने दिली स्थगिती, पाटील पुन्हा तळेगावला जाणार ?

Talegaon Dabhade Nagar Parishad: खासदार बारणेंनी आणलेले व नंतर आमदार शेळकेंनी बदललेले तळेगावचे सीईओ पाटील यांच्या बदलीला मॅटची स्थगिती ?

उत्तम कुटे

Pimpri News: शिंदे शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या शिफारसीवरून टर्म पूर्ण होण्यापूर्वीच बदली झालेले तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) नगरपरिषदेचे सीईओ विजयकुमार सरनाईक यांची सात महिन्य़ांतच राज्य सरकारने तळेगावलाच शुक्रवारी पुन्हा बदली केली. त्यांनी सोमवारी चार्ज घेतला. दरम्यान, ज्यांच्या जागी ते गेले, ते एन. के. पाटील हे लगेच मॅटमध्ये गेले. तेथे आपल्या बदलीला तात्पुरती स्थगिती मिळाल्याचे त्यांनी आज सांगितले.

पाटील यांची 1 तारखेला बदली पिंपरी-चिंचवड महापालिकेत राज्य सरकारने (नगरविकास विभाग) केली होती, पण ते तेथे हजर झाले नाहीत. आपली बदली ही मुदतपूर्व केल्याने ती चुकीची असल्याचे सांगत ते सोमवारी राज्य प्रशासकीय लवादात म्हणजे मॅटमध्ये गेले. तेथे बदलीला हंगामी स्थगिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सरनाईक यांना तळेगावचे सीईओपद सोडावे लागणार असून, आपण तेथे पुन्हा रुजू होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाटील यांच्या नियुक्तीवरून खासदार बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यात मोठा कलगीतुरा रंगला होता. कार्यक्षम सरनाईक यांची बदली करून अकार्यक्षम पाटील यांना आणल्याने नगरपरिषद कारभाराचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप शेळकेंनी बारणेंवर केला होता.

तर तळेगाव नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या विनंतीवरून सरनाईकांच्या बदलीचे पत्र नगरविकासमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्याची कबुली बारणेंनी दिली होती.

गेल्या सात महिन्यांपासून मूलभूत नागरी सुविधा मिळत नसल्याने तळेगावकर हैराण झाले होते. नगरपरिषदेच्या कारभारातही विस्कळीतपणा आल्याने आमदार शेळकेंसह रहिवाशांनी पाटील यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला होता.

शेळके यांनी पाटील यांच्या बदलीची मागणीवजा तक्रार केली होती. ती मान्य झाल्याने त्रस्त तळेगावकरांनी सुटकेचा निश्वासही सोडला होता, तर खासदार, आमदारांच्या या लढाईत आमदारांचा विजय झाल्याचे मानले जात आहे; पण त्यात पुन्हा ट्विस्ट आला. त्यात पुढे काय होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT