PMC Budget : भाजपचे लोकसभा इलेक्शन बजेट आयुक्तांच्या पोतडीतून .....

Pune Municipal Corporation's News : बजेटच्या माध्यमातून भाजपचे अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास जाणार ?
PMC Pune News
PMC Pune NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घाई घाईत बजेट मांडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या बजेटच्या माध्यमातून भाजपने सुरू केलेल्या अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आणि भाजपने घोषणा केलेले योजना पूर्ण करण्याचे काम महापालिका आयुक्तांना करायचे आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

PMC Pune News
Solapur Political News : देशमुखांच्या राजीनाम्याची चंद्रकांतदादांनी केली पोलखोल; म्हणाले...

महापालिकेच्या सभासदांची मुदत संपुष्टात आल्यानंतर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून मांडले जाणारे हे दुसरे बजेट असणार आहे. पालिका आयुक्त प्रशासक म्हणून हे बजेट मांडतील. २०२३-२४ मध्ये जानेवारी मध्ये झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक तसेच पुण्यात आयोजित करण्यात आलेली जी २० परिषद यामुळे पालिका आयुक्तांचे बजेट लांबले होते. दरवर्षी जानेवारीमध्ये मांडले जाणारे हे बजेट दोन महिने पुढे जाऊन मार्च २०२३ मध्ये मांडले गेले होते. मात्र आगामी लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेत बजेट अडकू नये, यासाठी 2024-25 चे महापालिकेचे बजेट लवकरात लवकर मांडण्याचा विचार पालिका आयुक्त कार्यालयाकडून सुरू करण्यात आला आहे.

महापालिकेचे २०२३-२४ चे बजेट सादर करताना मागील वर्षीच्या २०२२-२३ च्या बजेटमध्ये तब्बल एक हजार कोटी रूपयांची वाढ करत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी साडेनऊ हजार कोटी रूपयांचे बजेट मांडले होते. प्रशासक म्हणून सध्या तेच या बजेटची अंमलबजावणी करत आहेत. पालिका आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर विक्रम कुमार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या मंडळींशी जुळवून घेणे पसंत केल्याने तीन वर्षानंतरही ते आपल्या कामाच्या तत्परतेमुळे या पदावर टिकून आहेत.

PMC Pune News
Maharashtra News : अरेरे... नको तिथे महाराष्ट्र पहिल्या स्थानावर

गेल्या वर्षी राजकीय घडामोडी घडून राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपल्याने गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत पुन्हा आयुक्तांच्या बदलीची चर्चा होती. परंतू पुन्हा एकदा त्याला पूर्णविराम मिळाला आहे.

PMC Pune News
Congress : पिंपरी-चिंचवड शहर,जिल्ह्याची काँग्रेस कार्यकारिणी जाहीर व्हायला तब्बल दोन वर्षे का लागली?

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात मिळालेल्या यशामुळे केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपचा आत्मविश्वास अधिक वाढला असून पुढील काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने पालिका आयुक्तांच्या कामावर विश्वास दाखविला आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी आता आयुक्तांवर राहणार असून नागरिकांच्या फायद्यासाठीच्या योजनांची घोषणा करून त्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. तशा सूचना विभागांना देण्यात आल्या असून पालिका आयुक्तांचे हे बजेट लोकसभा निवडणूकीत महत्वाची भूमिका बजाविणार असल्याची चर्चा पालिकेत सुरू झाली आहे.

PMC Pune News
Congress : पिंपरी-चिंचवड शहर,जिल्ह्याची काँग्रेस कार्यकारिणी जाहीर व्हायला तब्बल दोन वर्षे का लागली?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com