NCP Crisis News: राजकीय पक्षांना आगामी निवडणुकांचे वेध; शहर कार्यकारिणी जाहीर करण्याचा लावला धडाका

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शहर कार्यकारिणी जाहीर करीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची अजित पवार गटावर आघाडी
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri News: राष्ट्रवादीतील फुटीनंतर या पक्षाच्या दोन्ही गटांना नवी कार्यकारिणी करण्याची पाळी आली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने पिंपरी-चिंचवडमध्ये आपली टीम मंगळवारी अगोदर जाहीर करत अजित पवार गटावर आघाडी घेतली.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उद्योगनगरीतील कार्यकर्तेही विभागले गेले. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी तुषार कामठे यांची 16 सप्टेंबरला निवड केली. तर, अजित पवार गटाने जुने अध्यक्ष (अजित गव्हाणे) कायम ठेवले.

कामठे यांनी अडीच महिन्यात आपली नवी तरुण कार्यकारिणी घोषित केली. तर, गव्हाणेंची ती बाकी आहे. दरम्यान, शरद पवारांची नवी टीम जाहीर होताच अजित पवार गटाने आपली कार्यकारिणी तयार करायला घेतली आहे. 25 तारखेपर्यंत जाहीर केली जाईल, असे पक्षातील एका जबाबदार पदाधिकाऱ्याने 'सरकारनामा'ला सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar and Ajit Pawar
Drug Mafia Lalit Patil: ललित पाटील प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ. देवकाते यांना अटक

दरम्यान, आगामी निवडणुका (Elections) लक्षात घेऊन शहरातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून आपापल्या टीम ते जाहीर करू लागले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष (भोसरीचे आमदार महेश लांडगे -Mahesh Landge) बदलल्याने नवीन अध्यक्षांनी (शंकर जगताप) आपली नवीन कार्यकारिणी सप्टेंबरमध्ये प्रथम जाहीर केली.

तर, 7 ऑक्टोबर 2021 ला अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेल्या काँग्रेसच्या कैलास कदम यांनी त्यासाठी तब्बल दोन वर्षे घेतली. सोमवारी त्यांनी आपली जंबो कार्यकारिणी जाहीर केली. तर, आज राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीची ती घोषित झाली.

राष्ट्रवादीच्या टीममध्ये 15 उपाध्यक्ष, नऊ सेक्रेटरी

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आपले बहुतांश सहकारी तरुणच घेतले आहे. त्यात महिलांनाही स्थान आहे, 54 जणांच्या या टीममध्ये एक कार्याध्यक्ष (देवेंद्र तायडे), तीन सरचिटणीस (जयंत शिंदे, शकुंतला भाट आणि अशोक तनुपरे), दोन संघटक, नऊ चिटणीस आणि 15 उपाध्यक्ष या कार्यकारिणीत आहेत. उच्चाशिक्षित माधव पाटील यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विविध सेल अध्यक्षही नेमण्यात आले आहेत.

(Edited by- Ganesh Thombare)

Sharad Pawar and Ajit Pawar
Pune Political News : ...अन आमदार सुनिल टिंगरे झाले निर्धास्त!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com