Teacher Recruitment Sarkarnama
प्रशासन

Teacher Recruitment : रयत शिक्षण संस्थेकडून 808 शिक्षकांची मेगा भरती; आत्ताच अर्ज करा

Anand Surwase

Employment News : शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्थेत काम करण्याची सुवर्ण संधी आहे. रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यावतीने शिक्षकांच्या भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या विविध शैक्षणिक शाखांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. या माध्यमातून उमेदवारांना पहिली ते बारावीच्या मराठी माध्यमाच्या शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीनुसार संस्थेकडून तब्बल 808 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये माध्यमिक शिक्षकांच्या 733 जागा, उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या 55 जागांवर शिक्षण सेवक म्हणून भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर भेट द्यायची आहे. https://tait2022.mahateacherrecruitment.org.in अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना पोर्टलवर लॉगिन करणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवार रयत शिक्षण संस्थेच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करत असेल तर अर्ज करता येणार आहे.

अर्ज करताना उमेदवारांना शैक्षणिक अहर्तेची सविस्तर माहिती भरायची आहे. तसेच संबंधित कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. यामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रे, उमेदवाराचे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्राचा समावेश असेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या भरतीसाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा 2022 मधील अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच 6 ते 8 वी पर्यंतच्या इतिहास आणि भूगोल विषयाच्या शिक्षक पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे TET/CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात पाहावी.

जाहिरात लिंक -http://rayatshikshan.edu/WebFiles/Pavitra%20Portal

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT