Lok Sabha Election 2024 : काँग्रेसकडून नांदेडमध्ये जोरदार तयारी; बूथ प्रमुखांना दिलं जातंय खास प्रशिक्षण

Nanded Congress : काँग्रेस पक्षानेही लोकसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदान केंद्रनिहाय बांधणी केली जात असून समित्या स्थापन केल्या जात आहेत.
Nanded Congress
Nanded CongressSarkarnama
Published on
Updated on

Nanded News: कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी नियोजन, प्रक्षिण, प्रचार, प्रसार या गोष्टीवर भर द्यावा लागतो. परंतु काळ बदलला तसे निवडणूक जिंकण्याचे तंत्रही बदलेले आहे. प्रत्येक पक्षांनी निवडणुकीसाठी स्वतंत्र अशी निवडणूक यंत्रणा तयार केली आहे. अशी यंत्रणा राबविण्यात भारतीय जनता पक्षाचा हातखंडा आहे, पण आता काँग्रेसही यात मागे नाही. (Lok Sabha Election 2024)

प्रशासनाच्या पातळीवर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. तयारीचा आढावा वरिष्ठ अधिऱ्यांकडून दररोज घेतला जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षानेही लोकसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदान केंद्रनिहाय बांधणी केली जात असून समित्या स्थापन केल्या जात आहेत.

या बूथ प्रमुखांना काँग्रेसकडून विशेष प्रशिक्षण देऊन निवडणुकीसाठी तयार करण्यात येत आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, मुखेड, देगलूर हे सहा मतदारसंघ येतात. या सहा मतदारसंघात काँग्रेसने बूथ कमेटी स्थापन केल्या आहेत. बैठका, सभा घेतल्यानंतर आत्ता कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nanded Congress
Abdul Sattar On Reservation : 'जरांगे पाटील,भुजबळसाहब का होने दो...'; मुस्लिम आरक्षणावर सत्तारांचा सबुरीचा सल्ला

गेल्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवातून धडा घेत काँग्रेस आता अत्यंत सावधपणे पावलं टाकतांना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. ते स्वतः लक्ष घालून तयारीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन, सूचना करत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात लोकसभा निवडणुकीला घेऊन उत्साहाचे वातावरण पहायला मिळते.

जिल्ह्यातील भोकर व नायगाव विधानसभा मतदारसंघाचे बूथ प्रमुख व निवडक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. या प्रशिक्षण वर्गात मतदान प्रक्रिया, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणे, मतदारांशी संपर्क करणे, मतदान यंत्र, पोलचिट वाटप, पोलींग एजंट आदी बाबतीत सखोल माहिती देण्यात आली.

नांदेडची जागा पुन्हा जिंकण्यासाठी काँग्रेस सावधपणे तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रशिक्षणाकडे बघितले जात आहे. बूथ कमेटीमध्ये 25 सदस्य नियुक्त करण्यात येत आहेत. मतदान केंद्रातील भागात राहणाऱ्यांना सदस्य करून पक्षाच्या प्रवाहात आणले जात आहे. निवडणुकीसाठी सुसज्ज व प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली जात असून या बूथ कमिटीच्या बळावर निवडणूक जिंकण्याचा काँग्रेसने निर्धार केला आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Nanded Congress
Prakash Ambedkar : भूमच्या घटनेवरुन अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर भडकले; म्हणाले, 'फडणवीसांचे गृहमंत्रालय...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com