Maharashtra Teacher  Sarkarnama
प्रशासन

Teacher News: जुनी अट हटवली! संस्थांतर्गत बदल्यांबाबत नवे आदेश, शिक्षक आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Teacher Transfer Rules Changed: महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाने अनेक दिवसांपासून उपस्थित केलेल्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. संस्थांतर्गत जिल्हास्तरीय बदली करताना शिक्षणाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Mangesh Mahale

Maharashtra Teacher Transfer: शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कराड येथे शिक्षक आमदार जयंत आसगावकर ( Jayant Asgaonkar) आणि ज्ञानेश्वर म्हात्रे ( Dnyaneshwar Mhatre) यांच्या उपस्थितीत विभागीय शिक्षण उपसंचालक आणि कोल्हापूर विभागातील जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाने अनेक दिवसांपासून उपस्थित केलेल्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. संस्थांतर्गत जिल्हास्तरीय बदली करताना शिक्षणाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यापूर्वी ही अट प्रामुख्याने कोल्हापूर विभागात लागू होती. मात्र राज्यातील इतर विभागांमध्ये अशी सक्ती नसल्याने मुख्याध्यापक महामंडळाने याविरोधात सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी यासंदर्भात परिपत्रके काढली आहेत.

या निर्णयामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. या निर्णयासाठी शिक्षक आमदार, विभागीय शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, विविध जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही अशाच प्रकारची परिपत्रके जारी व्हावीत, यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी आणि आश्वासित प्रगती योजनेशी संबंधित प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांच्या मंजुरीशिवाय थेट लेखाधिकाऱ्यांकडे पाठविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

जिल्हाअंतर्गत बदलीसाठी शिक्षणाधिकारी यांची मान्यता घेण्याची तरतूद कोठेही नाही परंतु कोल्हापूर विभागात अशा प्रकारे जिल्हा अंतर्गत होणाऱ्या बदली देखील मान्यता घेण्यास भाग पाडले जायचे त्यामुळे विनाकारण हेलपाटे मारावे लागत असे व वेतन मिळण्यास विलंब होत असे त्यामुळे तरतूद नसताना जिल्हा अंतर्गत बदलीस मान्यता घेण्याचा आग्रह धरू नये, अशा प्रकारे संघटनांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांपुढे मागणी करण्यात आली व ती त्यांनी मान्य केली आहे.

शिवाजी खांडेकर, सेक्रेटरी (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ)

महत्त्वाचे मुद्दे

* संस्थांतर्गत जिल्हा बदलीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या मंजुरीची गरज नाही

* मुख्याध्यापक महामंडळाच्या पाठपुराव्याला यश

* सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये परिपत्रके जारी

* शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

* सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही अशीच अंमलबजावणी करण्याची मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT