Tukaram Munde, Dhananjay Munde Sarkarnama
प्रशासन

Tukaram Munde Transfer : तुकाराम मुंडे आता धनंजय मुंडेंच्या खात्यात; दोन्ही मुंडेंची साथ टिकणार का ?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : करड्या शिस्तवरून प्रशासन आणि राजकारण्यांच्या नाकावर टिच्चून धडाकेबाज निर्णय घेणारे प्रंसगी मंत्र्यांचाही विरोध झुगारून आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे सनदी अधिकारी (आयएएस) तुकाराम मुंडे यांची शिंदे-फडणवीस-पवार सरकारनेही पुन्हा बदली केली.

गेल्या पावणेदोन महिन्यात मुंडेंची ही दुसरी बदली आहे. नव्या आदेशानुसार मुंडेंकडे कृषी, पशुसंवर्धन खात्याच्या सचिव पदावर बदली केली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या 'धडाडी'ला प्रशासनातील मुंडेंचीही साथ मिळाली आहे. आता हे दोन्ही मुंडे एकत्र किती दिवस काम करतील, याकडे लक्ष आहे. (Latest Political News)

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच तब्बल ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या शुक्रवारी सरकारने केल्या आहेत. यात पुन्हा एकदा तुकाराम मुंडे यांचे नाव असल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. मुंडे यांची अवघ्या पावणेदोन महिन्यांतच पुन्हा बदली केल्याने कुणाचेही सरकार असेना मुंडेचा वनवास काही संपत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीच्या पदावरून त्यांची महिन्यााभरातच उचलबांगडी झाली होती.

महाविकास आघाडीच्या काळात मुंडे यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले होते. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुंडे यांच्याकडे आरोग्य विभागातील महत्वाचे पद देण्यात आले होते. त्यांनी राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रूग्णालयांची पाहणी सुरू केली. मुंडेंनी कोरोना काळातील खरेदीची चौकशी करण्याची तयारी सुरू केली. मात्र त्यांची डिसेंबर २०२२ मध्ये मुंडे यांची उचलबांगडी करण्यात आली.

यानंतर मात्र त्यांना काही महिने कुठलेही पद देण्यात आले नव्हते. मे २०२३ मध्ये तुकाराम मुंढे यांना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. या पदावर महिना होत नाही तोच पुन्हा त्यांची बदली करण्यात आली. गेल्या महिन्यात २ जून रोजी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या मुख्य सचिवपदावरून त्यांना मराठी राजभाषा सचिव म्हणून बदलण्यात आले होते.

आताही मराठी राजभाषा सचिव पदावरून पुन्हा फक्त ४९ दिवसांत त्यांना कृषी आणि पशुसंवर्धन विभागात पाठवण्यात आले आहे. महिन्या-दोन महिन्यातच होणाऱ्या बदल्यांमुळे तुकाराम मुंडे राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. आता कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि तुकाराम मुंडे यांची साथ किती दिवसांची असणार, याकडे लक्ष लागले आहे.

१८ वर्षे २२ बदल्या

आयएएस तुकाराम मुंढे यांच्या आत्तापर्यंत झालेल्या बदल्या

ऑगस्ट २००५ - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.

सप्टेंबर २००७ - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.

जानेवारी २००८ - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.

मार्च २००९ - आयुक्त, आदिवासी विभाग.

जुलै २००९ - सीईओ, वाशिम.

जून २०१० - सीईओ, कल्याण.

जून २०११ - जिल्हाधिकारी, जालना.

सप्टेंबर २०१२ - विक्रीकर सहआयुक्त मुंबई.

नोव्हेंबर २०१४ - सोलापूर जिल्हाधिकारी.

मे २०१६ - आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

मार्च २०१७ - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.

फेब्रुवारी २०१८ - आयुक्त, नाशिक महापालिका.

नोव्हेंबर २०१८ - सहसचिव, नियोजन.

डिसेंबर २०१८ - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.

जानेवारी २०२० - आयुक्त, नागपूर महापालिका.

ऑगस्ट २०२० - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.

जानेवारी २०२१ - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.

सप्टेंबर २०२२ - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.

२९ नोव्हेंबर २०२२ - नियुक्तीच्या प्रतीक्षेत

एप्रिल २०२३ - सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

२ जून २०२३ - सचिव मराठी भाषा विभाग

२१ जुलै २०२३ - सचिव कृषी आणि पशुसंवर्धन

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT