Tukaram Munde Sarkarnama
प्रशासन

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढेंच्या बदलीने दूध उत्पादक निराश, तर 'त्या' अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास!

Tukaram Mundhe and Solapur District Cooperative Milk Union Inquiry : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची दाबून ठेवलेली चौकशी मुंढे यांनी सुरू केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Tukaram Mundhe Transfer and Politics : राज्यभरात कायम बदली होणारे अधिकारी म्हणून परिचित असणाऱ्या तुकारम मुंढे यांची नुकतीच पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव पदावरून उचल बांगडी करण्यात आली आहे. तर त्यांच्या या बदलीमुळे सोलापूर जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये नाराजी पसरल्याचे दिसत आहे.

त्यांच्या बदलीमुळे विभागात सुरू असलेल्या सुधारणांना खीळ बसणार असल्याचही बोललं जात आहे. तर काहींनी जिल्हा दूध संघावरील कारवाईही ढेपाळण्याची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे मुंढे यांच्या बदलीमुळे विभागातील बहुतांश अधिकाऱ्यांनी मात्र सुटकेचा निःश्वास सोडल्याच्याही चर्चा आहेत.

तुकाराम मुंढे(Tukaram Mundhe) यांची बदली शासनाने पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या सचिव पदावरून, असंघटित कामगार विभागाच्या विकास आयुक्त पदावर केली आहे . यामागे पशुसंवर्धन विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्या पराभवाचे खापर मुंढे यांच्यावर फोडण्यात आल्याची चर्चा आहे.

कारण, नगर जिल्ह्यात निवडणुकीत दूध उत्पादकांनी मतदानाद्वारे आपला रोष प्रकट करत विखे यांचा पराभव केला, असा अंदाज वर्तवला जात असून याला दूध अनुदान योजनेची जोडण्यात आले आहे. म्हणूनच मुंढे यांची बदली झाल्याचा दावा केला जात आहे.

मुंढे यांनी पशुसंवर्धन विभागाचा पदभार घेताच या विभागातील बेशिस्त कारभाराला चाप लावण्याचा धडाका लावला होता. मात्र त्यांच्या या सुधारणा विभागातील कामचुकार अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांच्या पचनी पडल्या नाहीत. यामुळे मुंढे हटाव मोहीम विभागातून सुरू होती. त्यातच अनुदान योजनेतील त्रुटींना मुंढे हेच जबाबदार असल्याचे भासविण्यात ही अधिकाऱ्यांची लॉबी यशस्वी ठरली.

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची दाबून ठेवलेली चौकशी मुंढे यांच्या नियुक्तीनंतर सुरू झाली होती. आता मुंढे यांच्या बदलीनंतर या चौकशीचे काय होणार? असा प्रश्न जिल्ह्यातील दूध उत्पादकांसमोर आहे.

मुंढे यांनी सुरू केलेल्या सुधारणा -

- प्रत्येक जनावरांना आधार नोंदणीकृत क्रमांक असलेला कानातील बिल्ला मारणे अनिवार्य

- प्रत्येक पशुवैद्यकाने दररोज किती जनावरांवर उपचार केले व काय उपचार केले? याची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरणे अनिवार्य

- पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग या दोन्ही विभागाचे एकत्रीकरण

- पशुवैद्यकाने आपल्या कार्यक्षेत्रात किती दूध उत्पादन होते, याची माहिती शासनाला कळविणे

सुधारणांचा असा झाला परिणाम -

जिल्ह्यात अपवाद वगळता पशुवैद्य नेमणूक असलेल्या ठिकाणी न जाता स्वतःचा खासगी व्यवसाय करतात. यातून कोट्यवधी रुपयांची माया कमावण्याची कित्येक उदाहरणे जिल्ह्यामध्ये आहेत. मुंढे यांच्या ऑनलाइन पोर्टल प्रणालीमुळे पशुवैद्यकाला आपल्या कार्यक्षेत्रात जावे लागत होते. त्याचबरोबर मोफत उपचार करण्याची वेळ त्याच्यावर आली.

'दूध का दूध पानी का पानी' -

तुकाराम मुंढे यांनी जनावरांना एअर टॅग (कानातील बिल्ला) अनिवार्य केल्यामुळे राज्यात एकूण जनावरांची संख्या किती? यातील दुप्त्या जनावरांची संख्या किती? याची आकडेवारी गोळा होत होती. यातून राज्यातील एकूण दूध उत्पादनाचा अंदाज येणार होता. या आकडेवारीमुळे राज्यात भेसळ असणारे दूध किती? भेसळखोर कोण? आहेत याची माहिती समोर येणार होती. मुंढे यांच्या या धोरणामुळे दूध का दूध व पाणी का पाणी होणार होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT