Maharashtra IAS Officer .jpg Sarkarnama
प्रशासन

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या महसूल खात्यातून मोठी बातमी! एकाचवेळी 'या' 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं 'प्रमोशन'; थेट 'IAS' चा दर्जा

Central Government : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील 12 ज्येष्ठ अधिकाऱ्यांना सोमवारी (ता.14) आयएएस कॅडर मिळाल्याची अधिसूचना जारी केली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील 12 ज्येष्ठ अधिकाऱ्यांना सोमवारी (ता.14) आयएएस (IAS) कॅडर मिळाल्याची अधिसूचना जारी केली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल खात्यातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत प्रमोशन देण्यात आलं आहे.

केंद्र सरकारच्या पर्सनल,पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी करत माहिती दिली आहे. 1 जानेवारी 24 ते 31 डिसेंबर 24 या रिक्त असलेल्या जागांवर संबंधित नव्या 12 आयएएस केडरचा दर्जा मिळालेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सेवेत असलेल्या महसूल खात्यातील विजयसिंह देशमुख,विजय भाकरे, त्रिगुण कुलकर्णी, गजानन पाटील, महेश पाटील, आशा पठाण, पंकज देवरे, मंजिरी मनोलकर, राजलक्ष्मी शहा, सोनाली मुळे, गजेंद्र बावणे व प्रतिभा इंगळे या अधिकाऱ्यांचा भारतीय प्रशासकीय सेवेत समावेश झाला आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.ते ट्विटमध्ये म्हणतात, महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आज नवीन अध्याय जोडला गेला. केंद्र सरकारच्या पर्सनल,पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने अधिसूचना जारी केली.

महाराष्ट्र महसूल सेवेतील बारा अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत केले. मी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी,यासाठी यासर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्राचा महसूलमंत्री म्हणून,महाराष्ट्र महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना नेहमीच मी प्रोत्साहन देत असतो. त्यांच्या गुणांचे कौतुक मी जाहीरपणे तर करतोच पण विधिमंडळात त्यांची प्रशंसा करतो. उद्देश एकच, लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत जाव्यात,असंही बावनकुळे यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी महसूल विभाग हा महाराष्ट्राचा प्रशासकीय कणा असल्याची भावना ट्विटमध्ये व्यक्त केली आहे. म्हणून या अधिकाऱ्यांनी आता आपली संपूर्ण क्षमता महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगी आणावी अशी सदिच्छा व्यक्त करतो.

मा मुख्यमंत्री श्री.@Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात राज्यातील अधिकाऱ्यांना मिळालेली शाबासकी म्हणजे आजची पदोन्नती असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आज नवीन अध्याय जोडला गेला आहे, असे म्हणत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT