Mahayuti Controversy: कोल्हापुरात 10 आमदार असलेल्या महायुतीत वादाचा भडका; आबिटकरांनाच विरोध,भाजपनं घातला थेट मुद्द्यालाच हात

Mahayuti News : कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती आणि अन्य समित्यांवरील सदस्य निवडण्यासाठी महायुतीचे एकमत झालेले नाही. राज्यात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरवण्यावरून महायुतीमध्ये बऱ्याच कालावधीनंतर एकमत झाले.
Kolhapur Mahayuti And Prakash Abitkar
Kolhapur Mahayuti And Prakash Abitkar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य एवढी वरून महायुतीत अंतर्गत ठिणगी पडली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि त्यांच्या पक्षाला 60% आणि भाजप आणि राष्ट्रवादीला उर्वरित 40% जागा देण्याचे सूत्र ठरले असताना भाजपने त्याला विरोध केला आहे. सहपालकमंत्री माधुरी मिसाळ भाजपच्याच असल्यानं जागा वाटपाचे सूत्र समान ठेवावे, अशी मागणी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा नियोजन समिती आणि अन्य समित्यांवरील सदस्य निवडण्यासाठी महायुतीचे एकमत झालेले नाही. राज्यात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरवण्यावरून महायुतीमध्ये बऱ्याच कालावधीनंतर एकमत झाले. आता जिल्ह्यातील अनेक समित्यांवरील सदस्य निवडण्यावरून पुन्हा महायुतीमध्ये मतभेद दिसून येत आहेत.

जिल्हा नियोजन समिती आणि अन्य समित्यांसाठी 60 आणि 40 चे सूत्र ठरले आहे. त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांकडे एकूण जागांपैकी 60 टक्के जागा देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात उर्वरित 40 टक्के जागांपैकी 20 टक्के भारतीय जनता पक्षाला व 20 टक्के जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार आहेत.

मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी याला आक्षेप घेतला आहे. जागा वाटपाच्या याच सूत्राचा वापर करायचा असल्यास जिल्ह्याला सहपालकमंत्री भाजपच्या (BJP) आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या 60 टक्के जागांमधील 30 टक्के वाटा भाजपला मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.

Kolhapur Mahayuti And Prakash Abitkar
Maharashtra Politics: जयंत पाटलांना आवडताहेत मोदींच्या योजना...; फडणवीसांची घेतली फिरकी

याबाबत शिवसेना शिंदे गटाने वेगळीच भूमिका मांडली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) हे शिवसेनेच्या कोट्यातून आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आमचे चार आमदार आहेत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

तर भाजपचे दोन आणि चंदगडचे शिवाजी पाटील हे अपक्ष आमदार भाजप समर्थक आहेत. त्यामुळे त्यांची संख्या तीन आहे. आमदारांच्या संख्येवरून समित्यांचे सदस्यत्व वाटावे, अशी भूमिका शिवसेनेची आहे. त्यामुळे यावरूनही महायुतीतील त्रांगडे कायम आहे. यामुळे जिल्हा नियोजन समिती आणि अन्य समित्यांवरील सदस्यांची निवड कधी होणार, अशी चिंता आता कार्यकर्त्यांना लागली आहे.

Kolhapur Mahayuti And Prakash Abitkar
Municipal Elections : तयार राहा! अजित पवारांनी सांगून टाकलं महापालिका निवडणुका कधी होणार, दोन टप्प्यात जिल्हा परिषद अन्...

तर जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्ती या कारणावरून रखडल्या तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीतील सर्वच पक्षांना त्याची चिंता लागून राहिली आहे. कारण प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला तर त्याचा फटका महायुतीतील तिन्ही पक्षांना बसणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com