UPSC  Sarkarnama
प्रशासन

UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 120 जागांसाठी भरती; जाणून घ्या डिटेल्स

Anand Surwase

UPSC Exam 2024 : सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या उमेदवारांसाठी लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याची संधी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध पदांच्या 120 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. या भरतीमध्ये असलेली रिक्त पदे आणि भरतीचे स्वरूप याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

UPSC च्या माध्यमातून नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध विभागात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स 51 पदे, सायंटिस्ट-B (Physical-Civil) चे 01, अॅडमिन ऑफिसर 02, सायंटिस्ट-B 09 सायंटिस्ट-B (Environmental Science) 02, स्पेशलिस्ट ग्रेड-IIIची- 54 आणि इंजिनिअर & शिप सर्वेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल) चे 01, अशा एकूण 120 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या भरतीमध्ये असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स या पदासाठी उमेदवार हा इंजिनियरिंग पदवी प्राप्त असावा तसेच उमेदवारास किमान 02 वर्षे कामाचा अनुभव असावा किंवा उमेदवार हा एमएससी (Electronics/ Physics) पदवी प्राप्त असावा, किंवा B.Sc.(Physics/ Electronics) उमेदवार ही पात्र ठरू शकतो. मात्र, उमेदवाराला किमान 05 वर्षे कामाचा अनुभव आवश्यक आहे. तसेच सायंटिस्ट पदासाठी उमेदवार M.Sc (Physics/Chemistry) आणि 01 वर्ष अनुभव किंवा B.E/B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/ Civil Engineering) आणि 02 वर्षे अनुभव असलेला असावा.

यासह या भरतीमध्ये अॅडमिन ऑफिसर या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे किमान पदवीपर्यंत पूर्ण असावे. तसेच त्याला कामाचा किमान 03 वर्षे अनुभव असावा, तर सांयटिस्ट B (Environmental Science) आणि स्पेशालिस्ट ग्रेडIII या पदासाठी उमेदवार हा M.Sc (Zoology) आणि M.Sc उत्तीर्ण असावा याशिवाय त्याला किमान 03 वर्षे कामाचा अनुभव असावा. तसेच शिप सर्वेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल या पदसाठी सागरी अभियंता अधिकारी वर्ग-1 यांचे योग्यतेचे प्रमाणपत्र प्राप्त असावे शिवाय उमेदवाराकडे किमान 05 वर्षे कामाचा अनुभव असावा..

या भरतीसाठी विविध पदांसाठी वयाची अटही किमान 29 फेब्रुवारी 2024 रोजी किमान 35 , 38 आणि 40 तर जास्तीत जास्त 45 असावी. या भरतीसाठी उमेदवाराला सरकारी नियमानुसार SC/ST: 05 वर्षे वयाची अधिकची सूट, तर OBC साठी 03 वर्षे वयाची सूट दिली जाणार आहे.

तसेच या भरतीच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात आणि आरक्षित जागांसंदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी इ्च्छुक उमेदवारांनी UPSC च्या संकेतस्थळावर (https://upsc.gov.in/) अधिकृत जाहिरात पाहावी. या भरतीसठी General/OBC/EWS उमेदवारांकडून 25/रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर SC/ST/PH/महिला या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

या विविध पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा, याव्यतिरिक्त अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पाहावी. जाहिरात लिंक -https://upsc.gov.in/sites/default/files/AdvtNo-03-2024-engl-09022024_0.pdf

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT