Additional Commissioner Post : अतिरिक्त आयुक्तपदासाठी 'अर्थपूर्ण ' स्पर्धा, चर्चेला उधाण!

Meeting of Divisional Promotion Committee : डीपीसी बैठक आयत्यावेळेस पुढे ढकलल्याने चर्चांना उधाण
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Pune Municipal Corporation News : महापालिकेतील अधिकाऱ्याची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्याचा मुहूर्त राज्य सरकारला अद्यापही सापडला नाही. नगर विकास विभागाने विभागीय पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक आयत्यावेळेस पुढे ढकलल्याने या नियुक्तीची 'अर्थपूर्ण स्पर्धा ' अधिक वाढत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेतील अधिकाऱ्याला पदोन्नती देत त्याची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त म्हणून करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. याचा फायदा घेत यापूर्वी पुणे महापालिकेत ज्ञानेश्वर मोळक, सुरेश जगताप यांनी या पदावर काम केले आहे. जगताप यांच्या निवृत्तीनंतर अद्यापही हे भरण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्याची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करणे गरजेचे असतानाही राज्य सरकारने या पदावर शासनाच्या व्यक्तीला कामाची संधी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Municipal Corporation
Pune BJP News : मेधाताईंना तिकीट देऊन हायकमांडने दिला शहर भाजपला कडक इशारा?

अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यासाठी महापालिका प्रशासनाने चार नावांची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. यामध्ये शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, श्रीनिवास कंदुल आणि मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांच्या नावांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांचे सेवा पुस्तक देखील नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. यापैकी वाघमारे आणि बोनाला यांनी आपल्याला पदोन्नती नको, असे कळविले आहे. त्यामुळे उर्वरित दोन अधिकारी कंदुल, कळसकर यांच्यामध्ये स्पर्धा असणार आहे.

या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी नगर विकास विभागातील अधिकाऱ्यांनी बैठक बोलाविली होती. मात्र ही बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली. यापूर्वी देखील ही बैठक आयत्यावेळेस पुढे ढकलण्यात आली होती. या पदासाठी सध्या अर्थपूर्ण स्पर्धा सुरू असल्याने ही बैठक पुढे गेल्याची चर्चा सध्या पालिकेत सुरू झाली आहे.

अतिरिक्त आयुक्त पदाच्या शर्यतीत असलेले कंदुल यांचा पालिकेतील सेवाकार्यकाळ केवळ पाच महिन्यांचा राहिला आहे. तर कळसकर यांची अजून सात वर्षे शिल्लक आहे. त्यामळे अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली, तर सात वर्षे त्या अतिरिक्त आयुक्तपदी असतील.

Pune Municipal Corporation
Sharad Pawar News : शरद पवारांचा कानमंत्र घेऊन शिलेदार लागले निवडणुकांच्या कामाला!

..तर कंदुलांचे स्वप्न अपूर्णच राहणार

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदासाठी नाव निश्चित करण्यासाठी घेतली जाणारी ही बैठक अशीच पुढे गेल्यास पुढील काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊ शकते. या काळात कोणतीही निवड, नियुक्ती करण्यास अडथळा होऊ शकतो. यामध्ये चार महिन्यांचा कालावधी गेल्यास कंदुल यांचे अतिरिक्त आयुक्त पदाचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com