SBI Recruitment 2024: भारतीय स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी; 130 जागा भरणार

Job opportunity in SBI : इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी SBI च्या अधिकृत संकेत स्थळावर भेट
SBI
SBI sarkarnama
Published on
Updated on

Banking Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी आहे. वित्तीय क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या वतीने विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापकीय पदाच्या एकूण 130 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये असिस्टंट मॅनेजर पदाच्या 23 जागा, तसेच डेप्युटी मॅनेजर पदाच्या 51 जागा, सिक्युरिटी मॅनेजरच्या 03 जागा, असिस्टंट जनरल मॅनेजर पदांच्या 3 आणि मॅनेजर पदाच्या 50 जागांचा समावेश आहे. या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही B.E./B.Tech.किंवा M.Sc., MCA अशी आहे. या भरतीसाठी पदनिहाय कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच मॅनेजर पदासाठी उमेदवार हा MBA / PGDBA / PGDBM / MMS (Finance) पदवी प्राप्त असावा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

SBI
Parbhani Municipal Corporation : परभणी महापालिकेत 'या' रिक्तपदांची भरती; वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स...

या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय हे दिनांक 01 डिसेंबर 2023 पर्यंत असिस्टंट मॅनेजर पदासाठी 30 वर्षे, डेप्युटी मॅनेजर पदासाठी 35, सिक्युरिटी मॅनेजर पदासाठी 38 वर्षे, असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी 42 वर्षे आणि मॅनेजर पदासाठी 25 ते 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे अधिकची सवलत, तर ओबीसी उमेदवारासाठी 3 वर्षे अधिकची सूट देण्यात आली आहे.

या भरतीसाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांनी SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आपले रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर आपला अर्ज भरावा, अर्जामध्ये शैक्षणिक माहिती आणि इतर तपशील अचूक भरावा, चुकीचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 750 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. उमेदवारांनी भरती शुल्क ऑनलाइन भरणा करायचे आहे. या नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे. या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एसबीआयची अधिकृत जाहिरात पाहावी. जाहिरात लिंक-

R

SBI
Additional Commissioner Post : अतिरिक्त आयुक्तपदासाठी 'अर्थपूर्ण ' स्पर्धा, चर्चेला उधाण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com