PM kisan Yojana  Sarkarnama
प्रशासन

PM Kisan Installment : राखी पौर्णिमेनिमित्त पीएम किसान योजनेचा ४ हजार रुपयांचा २४वा हप्ता येणार? 'त्या' व्हिडिओबाबत भारत सरकारनं दिलं स्पष्टीकरण

PM Kisan 24th Installment: पीएम किसान योजनेंतर्गत यंदा २४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याबाबत सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ फिरतो आहे, त्यात नेहमीपेक्षा अधिक रक्कमेचा दावा करण्यात आला आहे.

Amit Ujagare

PM Kisan Installment : पीएम किसान योजनेंतर्गत आजपर्यंत २३ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत, यानंतर पुढचा २४ वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. या हप्त्याबाबत सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हा हप्ता राखी पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर यंदा ही हप्त्याची रक्कम २००० रुपये नव्हे तर ४००० रुपये इतकी असणार आहे. यामुळं लाभार्थ्यांच्या मनात संभर्म निर्माण झाला असल्यानं त्यावर आता भारत सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे.

व्हिडिओत नेमकं काय म्हटलं आहे?

जनसेवा केंद्रातून एका पत्रकाराकडून या योजनेची माहिती देणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यानं दावा केला आहे की, रक्षा बंधनानिमित्त सरकार आता पीएम किसान योजनेंतर्गत २००० रुपये नव्हे तर ४००० रुपये इतकी रक्कम देणार आहे. त्यामुळं गेल्या व्हिडिओमध्ये आम्ही जी काम सांगितली होती ती पूर्ण करा. कारण तुम्हाला हप्ता यायला उशीर होता कामा नये. जर तुम्हाला तरीही अडचण येत असेल तर आमच्याशी कमेंटद्वारे संपर्क साधावा असा दावा यात करण्यात आला आहे.

व्हिडिओमुळं काय निर्माण होतोय संभ्रम

या व्हिडिओमध्ये नेहमीच्या २००० रुपये हप्त्याऐवजी ४००० रुपये हप्ता सरकार देणार असल्याचं म्हटलं आहे. यामुळं लाभार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. यापार्श्वभूमीवर आता भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं (PIB) या व्हिडिओचं फॅक्ट चेक केलं असून या फॅक्टचेकमध्ये पीएम-किसान योजनेचा २४ वा हप्ता ४००० रुपयांचा मिळणार असल्याची बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.

हा व्हिडिओ एआय जनरेटेड व्हिडिओ असून केंद्र सरकारनं अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जून २०२६ रोजी पीएम-किसान योजनेचा २३ वा हप्ता दिला होता. पण यानंतर आता २४ व्या हप्त्याबाबत सरकारन अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही, असंही सरकारच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT