ZP Teachers Transfer Relief News Sarkarnama
प्रशासन

ZP Teachers Transfer: हजारो शिक्षकांना दिलासा! बदल्या पुढे ढकलल्या; सर्व जिल्हा परिषदांना आदेश

ZP Teachers Transfer Relief News:जनगणना कामामुळे झेडपी शिक्षकांच्या बदल्या थांबवण्यात आल्या. ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना महत्त्वाचे आदेश दिले.

Mangesh Mahale

देशभरात जनगणनेचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. सप्टेंबर 2026 हा पहिला टप्पा असणार आहे. यात घरगणना होणार आहे. दुसर्‍या टप्प्यात फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या गणना होणार आहे. दरम्यान, जनगणना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी आदेश दिले आहे.

जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करु नका, असे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले. केंद्रीय गृह महाराष्ट्रात हा निर्णय लागू होणार का? अशी चर्चा सुरु असताना राज्यातील जिल्हा परिषदांबाबत राज्य सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घेत आदेश काढला आहे.

राज्यातील झेडपीमध्ये कार्यरत असलेले जे कर्मचारी, शिक्षक जनगणना कार्यक्रमात सहभागी आहेत, त्यांच्या बदल्यांना ब्रेक मिळाला आहे. जनगणनेची कामे करत असलेल्या कर्मचारी व शिक्षकांच्या यंदा बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.

'देशभरात सध्या जनगणनेचे काम चालू आहे. या पार्श्वभूमीवर जनगणनेचे काम करत असलेल्या कर्मचारी व शिक्षकांच्या यंदा बदल्या करु नयेत,' अशी सूचना केंद्रीय गृह सचिवांनी पत्राद्वारे राज्य सरकारला केली होती. ग्रामविकास विभागाच्या उपसचिव वैशाली डिगे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना कळविले आहे.

या सूचनेनुसार जनगणना अधिनियम, १९४८ आणि जनगणना नियम, १९९० अंतर्गत वैधानिक कर्तव्ये सुरळीतपणे पार पाडण्याकरीता जनगणनेच्या कामाशी संबंधित जिल्हा परिषदेतील गट-क व गट-क संवर्गातील (जिल्हा परिषदांमधील सर्व विश्वकांसह) कर्मचाऱ्यांची सन २०२६ ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

तात्पुरती स्थगिती

जनगणनेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना (शिक्षक, ग्रामसेवक, लिपिक इ.) जनगणना पूर्ण होईपर्यंत बदली केली जात नाही किंवा त्यांच्या बदलीवर तात्पुरती स्थगिती दिली जाते.

  • जनगणना प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत (घरगुती सर्वेक्षण, डेटा संकलन, पडताळणी)

  • काम पूर्ण होईपर्यंत किंवा शासनाकडून वेगळा आदेश येईपर्यंत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT