IAS Transfer: प्रशासकीय सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात 40 IAS ट्रान्सफर; 15 जिल्ह्यांचे DM बदलले!

UP IAS transfer: 8 जिल्हाधिकाऱ्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्यात आले आहे, तर 7 अधिकाऱ्यांना प्रथमच DM म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा सरकारचा प्रयत्न स्पष्ट दिसतो.
IAS Transfer Order
IAS Transfer OrderSarkarnama
Published on
Updated on

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सरकारने रविवारी मध्यरात्री मोठा निर्णय घेत राज्यातील प्रशासनात मोठी उलथापालथ केली. तब्बल 40 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 15 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी (DM) बदलण्यात आले आहेत. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या फेरबदलात 8 जिल्हाधिकाऱ्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्यात आले आहे, तर 7 अधिकाऱ्यांना प्रथमच DM म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा सरकारचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. रविवारी मध्यरात्री याबाबतचे आदेश देण्यात आले.

IAS Transfer Order
Maval Politics: निधी कोणाचा? मावळात शेळके-भेगडे यांच्यात श्रेयाची लढाई

काही महत्त्वाच्या विभागांमध्येही बदल करण्यात आले आहेत. परिवहन आयुक्त असलेल्या किंजल सिंह (Kinjal Singh) यांना हटवून आले असून आता त्यांना माध्यमिक शिक्षण विभागाचे सचिवपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्या अवघ्या सात महिन्यांपूर्वीच या पदावर त्या रुजू झाल्या होत्या. त्यांच्या जागी केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परतलेले आशुतोष निरंजन ( Ashutosh Niranjan) यांची परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Transfer Order
Sarkari Naukri: सरकारी बदलीचे नियम बदलले! राजकीय दबाव आणल्यास कारवाई होणार; असा असेल प्राधान्यक्रम

पहिल्यांदाच DM

पहिल्यांदाच DM पदाची जबाबदारी मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये बृजेश कुमार (औरैया), आलोक यादव (शामली), अभिषेक गोयल (हमीरपुर), इंद्रजीत सिंह (सुल्तानपुर), अन्नपूर्णा गर्ग (श्रावस्ती), नितिन गौड (अमरोहा) आणि सरनजीत कौर (रायबरेली) यांचा समावेश आहे.

दुर्गा शक्ती नेपाळ

याशिवाय, झांसी, आग्रा, सहारनपूर, उन्नाव, फतेहपूर यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्येही नव्या DM ची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन अधिक गतिमान करण्याचा सरकारचा स्पष्ट प्रयत्न दिसून येत आहे. कडक आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दुर्गा शक्ती नेपाळ ( Durga Shakti Nagpal) यांना देवीपाटन मंडल आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com