Police Inspector Promotion Sarkarnama
पुणे

Police Inspector Promotion: राज्यातील 104 पोलिस निरीक्षकांना दिवाळीआधीच मोठं 'गिफ्ट'

Pimpri-Chinchwad Police: पिंपरी महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बोनसनंतर शहरातील सहा पोलिस निरीक्षकांना एसीपीपदी प्रमोशन मिळाले

उत्तम कुटे

Pimpri News: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे साडेसहा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नुकताच 55 कोटी रुपयांचा दिवाळी बोनस (साडेआठ टक्के सानुग्रह अनुदान प्लस वीस हजार रुपये बक्षीस म्हणजे एक पगार) जाहीर झाल्याने त्यांची दिवाळी आणखी गोड होणार आहे.

तशीच आनंदाची बातमी राज्यातील 104 पोलिस निरीक्षकांना राज्य सरकारने दिली. त्यांना एसीपी (डीवायएसपी) म्हणून प्रमोशन दिल्याने त्यांचीही दिवाळी अगोदरच झाली आहे. त्यात सहाजण पिंपरी-चिंचवडमधील आहेत.

दरम्यान, आजची प्रमोशन ही उशिरा निघाली आहेत. त्यातही ओपन पोलिस निरीक्षकांना, तर त्यासाठी खूप वाट पाहवी लागली आहे. तरी देर आये, दुरुस्त आये, या न्यायाने त्यांनी त्याबद्दलही आनंद व्यक्त केला. प्रमोशन मिळालेल्या बहुतेक अधिकाऱ्यांना आहे तिथून दुसरीकडे, तर काहींना दूरवर पाठवण्यात आले आहेत. विवेक मुगळीकरसारखे त्याला अपवाद ठरले आहेत.

सध्या ते पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालयात हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत. त्यांना पिंपरी-चिंचवडमध्येच ठेवण्यात आले आहे. शहरातील इतर पाच पोलिस निरीक्षकांना मात्र बाहेर पाठविण्यात आले आहे. अनिल कोळी आणि मुगुटलाल पाटील हे बाहेरील दोन पीआय प्रमोशनवर एसीपी म्हणू्न शहरात आले आहेत.

प्रमोशन मिळून सहापैकी पाच पीआय शहराबाहेर गेले. त्यातील चारजण हे पोलिस ठाण्यांचे इन्चार्ज होते. त्यामुळे त्यांच्या जागी नवे सीनिअर पीआय म्हणून उद्याच काही पीआय़ शहरात बदलीवर येण्याची शक्यता आहे, तर आज पुण्यात बदली झालेल्या एका पीआयने शहरातच राहण्यासाठी लगेच सेटिंग लावली आहे.

भोसरी आणि तळेगाव पोलिस ठाण्याचे सीनिअर पीआय भास्कर जाधव आणि सत्यवान माने यांची पुण्यात 'सीआयडी'मध्ये डीवायएसपी म्हणून बदली झाली आहे. निगडीचे सीनिअर पीआय रंगनाथ उंडे यांना पुणे शहर पोलिस दलात, तर शहर कंट्रोल रूममधील पीआय रवींद्र जाधव यांना मात्र थेट चंद्रपूरला गडचांदूरचे डीवायएसपी म्हणून पाठवण्यात आले आहे. सहावे पीआय दीपक शिंदे यांची मुंबई पोलिस दलात बदली करण्यात आली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT