PCMC News : Sarkarnama
पुणे

PCMC News : एकाच दिवशी १७ गुंडांना `मोक्का`, तरीही पिंपरी-चिंचवडला गुन्हेगारांपासून धोका

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri-Chinchwad News : आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आता मोक्का पॅटर्न`सुरु केला आहे. आज एका दिवसांत त्यांनी तीन टोळ्यांतील २४ गुंडांना या संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा बडगा दाखवला. यावर्षी आतापर्यंत सात महिन्यांत त्यांनी २४ टोळ्यांतील २२६ गुंडांना `मोक्का` लावला आहे. तरीही शहरातील गुन्हेगारी उच्चाटन व्हायचं नाव घेत नाही.

चौबे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये पदभार घेतल्यानंतर राजकीय खूनांसारख्या गंभीर गुन्ह्यांत वाढ झाली. त्यातही मावळातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न तेथील राजकीय खून सत्रामुळे ऐरणीवर आला होता. मावळातच नाही, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवडसह चाकण-आळंदीपर्यंतच्या पोलिस आयुक्तालयात कोयता गँगचा उपद्रव वाढला होता. त्यामुळे विधानसभेतच हा प्रश्न उपस्थित झाला होता.

त्यानंतर पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी `मोक्का`चे हत्य़ार उपसले. त्यात यावर्षी आतापर्यंत सात महिन्यांत २४ टोळ्यांतील २२६ गुंडांना त्याचा तडाखा त्यांनी दिला. तरीही गुन्हेगारीचं उच्चाटन झालेले नाही. उलट मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात गुन्ह्यांच्या संख्येत किंचीत का होईना वाढच झाली आहे. त्यातही खूनासारख्या सर्वोच्च गंभीर गुन्हे महिन्यात तीनने वाढले आहेत.

१५ ऑगस्ट २०१८ रोजी पुणे पोलिस आय़ुक्तालयाचे विभाजन करून स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालय स्थापन झाले. पहिल्या वर्षी सात,तर दुसऱ्या वर्षी ५९ गुन्हेगारांना `मोक्का`चा प्रसाद` मिळाला.२०२० ला त्यात पु्न्हा घट होऊन हा आकडा पन्नास झाला.२०२१ त्याने शेअऱ बाजारासारखी उसळी घेतली. १८७ वर तो गेला.तर, शेअर बाजारासारखाच तो पुढल्या म्हणजे गेल्यावर्षी पुन्हा खाली १२९ वर आला होता.

यावर्षी,मात्र सात महिन्यातच त्याने गतवर्षाचा आकडा पार केला असून आताच तो २२६ वर गेला आहे.आठ गुन्हे दाखल असलेला पिंपरीचा यशवंत ऊर्फ अतुल सुभाष डोंगरे (वय २) आणि त्याची आठजणांची टोळी,सहा गुन्हे नोंद असलेला तळेगाव दाभाडे येथील सुधीर अनिल परदेशी (वय २५)व त्याच्या टोळीतील पाचजण आणि नऊ गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेला भोसरीतील सौरभ संतोष मोतारावे (वय २०)त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध एका दिवसात मोक्का कायद्यान्वये कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT