BJP  Sarkarnama
पुणे

BJP News : भाजप इलेक्शन मोडवर : बारामती, इंदापूर, कर्जत-जामखेडमध्ये रविवारी ५२ शाखांचे उद्‌घाटन

रविवारी सायंकाळी इंदापूर शहरात त्यांची जाहीर सभा होणार आहे.

संतोष आटोळे

इंदापूर : भारतीय जनता पक्ष इलेक्शन मोडवर असून मिशन बारामतीला पुन्हा बळ देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा व युवा वॉरियर्सच्या बारामती लोकसभेतील इंदापूर, बारामती तसेच, कर्जत जामखेड मतदार संघात येत्या रविवारी (ता.२६ मार्च) ५२ शाखांचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. (52 branches of BJP will be inaugurated in Indapur, Baramati on Sunday)

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रविवारी सायंकाळी इंदापूर शहरात त्यांची जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक काटे यांनी दिली.

इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी भारतीय जनता पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष शरद जामदार, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक काटे, शहराध्यक्ष शकील सय्यद, इंदापूर युवा मोर्चा अध्यक्ष तेजस देवकते आदी उपस्थित होते.

काटे म्हणाले की, येत्या २६ मार्च रोजी बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर व बारामती तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या शाखांचे उदघाटन व जाहीर सभा असा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. इंदापूर येथील नगर परिषदेसमोरील मैदानावर सायंकाळी पाच वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहितीही काटे यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गोपीचंद पडळकर, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे या प्रमुख मान्यवरांसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT