CBI Raid On Anil Ramod  Sarkarnama
पुणे

CBI Raid On Anil Ramod : रामोडांच्या घरात सापडले सहा कोटींचे घबाड; रात्री उशिरापर्यंत मोजदाद सुरूच !

Anil Ramod News : अतिरिक्त विभागीय आयुक्तांविरोधात चार दिवसांपूर्वी तक्रारदाराने तक्रार केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Pune : पुणे महसूल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयासह बाणेर, नांदेडमधील येथील घरावर सीबीआयने शुक्रवारी (दि.९) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास छापे टाकले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता या छापेमारीत सीबीआयच्या हाती मोठं घबाड लागलं असून तब्बल जवळपास दहा तासांनंतरही पथकाकडून झाडाझडती सुरु आहे.

पुणे महसूल विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ.अनिल गणपतराव रामोड (Anil Ramod) यांच्याविरोधात तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सीबीआयने अटक केली आहे. तसेच यावेळी सीबीआयने तपासादरम्यान अधिकाऱ्याकडून सुमारे सहा कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

अतिरिक्त विभागीय आयुक्तांविरोधात चार दिवसांपूर्वी तक्रारदाराने तक्रार केली होती. माळशिरस येथील एका शेतकर्‍याच्या जमिनीचे भू-संपादन झाले होते. त्याचा मोबदला लवकरात लवकर देण्यासाठी अधिकारी रामोड यांनी 10 लाखांची मागणी होती. संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ८ लाख रुपयांची लाच घेताना अनिल रामोड सापडले. ही लाच घेताना सीबीआय(CBI)ने त्यांना रंगेहाथ पकडले.

सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भूसंपादन कायद्याशी संबंधित प्रकरणे पाहत असल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. खेड्यातील शेतकरी त्यांच्या जमिनीचा जास्त मोबदला मागत आहेत आणि तक्रारदार अतिरिक्त विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तसेच सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय महामार्गांनुसार लवाद यांच्याकडे अधिक मोबदला मिळावा म्हणून त्यांची प्रकरणे मांडत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सीबीआयमार्फत पुण्यातील तीन ठिकाणी आरोपींच्या अधिकृत आणि निवासी जागेवर छापेमारी सुरु असून त्यात सहा कोटी रुपयांची रोकड, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर असलेल्या 14 स्थावर मालमत्ता,मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे; गुंतवणूक आणि बँक खात्यांचा तपशीलासह महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आलं आहे.

शनिवारी शिवाजीनगर येथील न्यायालयात रामोड यांना हजर करण्यात येणार आहेत. या अधिकाऱ्याची आणखी कुठे संपत्ती आहे का याचा शोध सीबीआयकडून करण्यात येत आहे. तब्बल सहा कोटींची रक्कम व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT