Pune Crime1 Sarkarnama
पुणे

Pune Crime : पुण्यात चाललंय तरी काय? सलग चौथ्या दिवशी अत्याचाराची घटना, घरात घुसून महिलेवर अत्याचार

Four incidents of torture in four days in Pune : पुणे शहर आणि परिसरामध्ये गेल्या चार दिवसांत अत्याचाराच्या चार घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे शहर आणि परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून चार अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी बाप देवघाटामध्ये तरुणीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर वानवडीमधील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला.

कोंढवा परिसरात एका चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार घटनेने खळबळ उडाली. आता सलग चौथी घटना समोर आली असून वारजे माळवाडी परिसरातील महिलेवर तिच्या घरात घुसून एकाने अत्याचार केला.

पुणे (Pune) शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणी वर आला आहे. पुण्यात सातत्याने घडणाऱ्या अत्याचाराच्या या घटनेमुळे महिला मुलींनी भीतीच वातावरण आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायद्याचा धाक राहिला नसल्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

वारजे माळवाडी पोलिस (Police) ठाण्याच्या हद्दीमध्ये एका 50 वर्षीय व्यक्तीने 36 वर्षीय महिलेवर जबरदस्ती केल्याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वारजे माळवाडी परिसरातील एका सोसायटीमध्ये ही 36 वर्षीय महिला राहते घरामध्ये भांडी घासत असताना तो 50 वर्षीय व्यक्ती घरात घुसला आणि आई कुठे आहे? आई कुठे आहे? असा आवाज देत महिलेला खाली पाडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

महिलेने आरडाओरडा करत कशी बशी आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि थेट वारजे माळवाडी पोलिस ठाणे गाठलं. या प्रकरणात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली, घटनेची माहिती पडताळून पाहत आहेत.

असुरक्षित पुणे?

पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. ड्रग्जपासून ते मुली, महिलांच्या असुरक्षितेचा प्रश्नांमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण होऊ लागलीत. गुंडांच्या टोळ्याच्या दहशत देखील वाढली आहे. गुन्हेगारीला कुठून तरी बळ मिळत आहे आणि त्यातून पुण्यात असुरक्षिते वातावरण निर्माण होताना दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT