Congress Vs BJP : आमदार पोचले, पदाधिकारी गोळा झाले; शहराध्यक्षांच्या घराबाहेर नेमकं काय झाले?

BJP targets Congress in Pune in Chandrapur atrocity incident : चंद्रपूरमधील अत्याचार प्रकाराचा निषेध नोंदवताना भाजपने काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरासमोर आंदोलन करत असल्याने पुण्यात तणावाचे वातावरण होते.
Congress Vs BJP
Congress Vs BJP Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे त्यांच्या घराबाहेर शनिवारी अचानक आमदार रवींद्र धंगेकर पोचले, त्यांच्या पाठोपाठ शहरातील अन्य पदाधिकारी दाखल झाले.

कार्यकर्त्यांनी ही गर्दी केली. एवढं कमी म्हणून ते काय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांचे पदाधिकारी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांनी देखील फौज फाटा तैनात केला. हा सर्व घटनाक्रम पाहणाऱ्या परिसरातील नागरिकांना प्रश्न पडला की नेमकं झालं तरी काय?

चंद्रपूरमधील कोरपना तालुक्यातील खासगी शाळेतील एका सहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल लोंढे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर सध्या राजकारण तापलं आहे. भाजपकडून (BJP) या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहेत. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून ही आंदोलन सर्वत्र करण्यात येत आहेत.

Congress Vs BJP
Supriya Sule Video : '...आई म्हणून उत्तर मागतेय', सुप्रिया सुळेंनी केली देवेंद्र फडणवीसांची कोंडी

पुण्यातील भाजप युवा मोर्चाकडून देखील, अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात येणार असल्याचे मेसेज व्हाट्सअपवर मोठ्या प्रमाणात फिरत होते. हे आंदोलन पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या घरासमोर करण्यात येणार असल्याचं या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं होत. या आंदोलनाचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस (Congress) पक्षाकडून याची गंभीर दखल घेत काँग्रेसचे कार्यकर्ते देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाल. आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला.

Congress Vs BJP
Sambhajiraje Chhatrapati : "अरे ही तर मोगलाई..."; संभाजीराजे का भडकले?

यानंतर मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद शिंदे यांच्या घराबाहेर पोचले, त्यांच्यासोबतच काही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे देखील पदाधिकारी होते. काँग्रेसचे पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर देखील त्या ठिकाणी दाखल झाले होते. यातमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे, संगीता तिवारी, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन तावरे आणि नितीन कदम यांचा समावेश होता.

पोलिसांचा हस्तक्षेप

या सर्वांनी अरविंद शिंदे यांच्या घराबाहेर खुर्च्या टाकून ठिय्या मांडला. पोलिसांनी परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेता, अरविंद शिंदे यांच्या घराकडे येणारे सर्व रस्ते बंद केले. तसेच मोठा फौज फाटा ही तैनात केला. यानंतर भाजप युवा मोर्चाकडून साधू वासवणी चौकात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आंदोलन तिथेच थोपवले.

भाजपने राजकीय संस्कृती बिघडवली

याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय संस्कृती बिघडत चालली आहे. आतापर्यंत आंदोलनही घरापर्यंत येत नव्हती. मात्र भाजपने आता ही आंदोलन ती राजकीय मंडळींच्या घरासमोर करण्यास सुरवात केली आहे". आता याला काँग्रेस देखील जशास तसे उत्तर देणार आहे. यापुढे काँग्रेस देखील कोणत्याही चौकात अथवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन न करता भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करेल, असा इशारा अरविंद शिंदे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com