Shivajirao Adharao Patil, Avinash Rahane
Shivajirao Adharao Patil, Avinash Rahane sarkarnama
पुणे

एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांचा 'भाव' वधारला

डी. के. वळसे पाटील

मंचर : दसरा मेळाव्याला गर्दी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) यांनी व शिवसेनेनीही शिरूर लोकसभा मतदार संघात जोरदार तयारी सुरु केली आहे. दसरा मेळाव्यात एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्यासाठी दोन्ही गटांमध्ये स्पर्धा रंगली आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे व शिंदे गटातील सामान्य कार्यकर्त्यांनाही आत्ता मागणी वाढली असून त्यांना सन्मान मिळू लागला आहे. त्यामुळे कार्यकर्ते खुशीत आहेत.

शिरूर लोकसभा मतदार संघातून आढळराव पाटील सलग तीन वेळा निवडून आले आहेत. बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी आढळराव पाटील यांच्यावर असून त्यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मेळाव्याला नेण्याची तयारी केली आहे.

यासंदर्भात 'सरकारनामा'शी बोलताना आढळराव पाटील म्हणाले ''युवकयुवती यांच्याप्रमाणेच जेष्ठांकडूनही दसरा मेळाव्यानिमित्त बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी आंम्हाला यायचे आहे. अशी विचारणा सातत्याने केली जात आहे. त्यानुसार आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, हवेली, हडपसर, भोसरी या भागातून १२५ बसेस व २०० चारचाकी वाहनांची सोय केली आहे.

साडेसात हजारापेक्षा अधिक कार्यकते मुंबईत मेळाव्याला जातील. कार्यकर्त्यांच्या संपर्कासाठी २५ जणांची समिती स्थापन केली आहे. दररोजच्या कामकाजाचा मी आढावा घेत आहे. कार्यकर्त्यांचा मिळत असलेला उत्स्पुर्त प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो.

शिवसेनेचे जिल्हा संघटक अँड. अविनाश रहाणे म्हणाले ''आमच्याकडे कोणीही भांडवलदार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकवर्गणी काढून शिवतीर्थ (शिवाजी पार्क) मैदानावर होणाऱ्या मेळाव्याला जाण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. आंबेगाव तालुक्यातून १० बसेस व ५० चार चाकी वाहने जातील. याव्यतिरिक्त काहीजण स्वखर्चाने एस. टीसह मिळेल त्या वाहनाने जाणार आहेत. तसेच जुन्नर, खेड, शिरूर, हवेली, भोसरी, हडपसर या भागातून मोठ्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT