ACB In Action Mode  Sarkarnama
पुणे

Pune ACB In Action Mode: पुणे 'एसीबी'कडून कारवाईचा जबरदस्त धडाका; छोटेच मासे गळाला पण, बड्या धेंड्यांचं काय?

सरकारनामा ब्यूरो

Pune News: 'एसीबी'ने पिंपरी-चिंचवडनंतर पु्ण्यातील लाचखोरांना आता लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. या महिन्यात त्यांनी पुण्यात तिसरा सापळा काल (ता.२२) रचला होता. पुणे महापालिकेचा कर्मचारी (वर्ग तीन) पांडुरुंग साधू लोणकर (वय ५७,स्टार्टर, वाहन वाटप, व्हेईकल डेपो, गुलटेकडी) याला एका कंत्राटी वाहनचालकाकडून चहाच्या टपरीवर चार हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. त्याच्या कामावरून निवृत्त होण्याला वर्षभराचाच कालवधी राहिला होता. (Latest Marathi News)

दरम्यान, पुणे एसीबीचा कारवाईचा धडाका सुरुच असला, तरी त्यात तुलनेने छोटे मासेच अधिक गळाला लागत आहेत. नाशिक रेंजच्या एसीबी युनिटसारखे मोठे मासे त्यांच्या गळाला क्वचितच लागत आहेत. परिणामी सापळा रचण्याच्या कारवाईत पुणे एसीबी युनीट हे राज्यातील आपला एक नंबर यावर्षी आतापर्यंत टिकवू शकलेले नाही, तो मान नाशिक युनीटकडे गेला आहे.

पुणे एसीबी युनीटच्या मागील सापळ्यामध्ये (ता.१०) ससून रुग्णालय अधिक्षक कार्यालय़ातील लिपिक गणेश सुरेश गायकवाड (वय ४९,वर्ग तीन) हा अडकला. त्याने दुसऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्याचे मेडिकल बिल पास करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच ससून रुग्णालयात स्वीकारली होती. तर,त्याअगोदर विश्रामबाग पोलिस ठाण्यातील 'पीएसआय' शंकर धोडिंबा कुंभारे (वय ४३) हा वर्ग दोनचा अधिकारी संभाजी पोलिस चौकीतच १५ हजार रुपयांची लाच घेताना दोन तारखेला पकडला गेला होता.

तसेच काल (दि. २२ ऑगस्ट) लाचखोरीत अटक झालेल्या लोणकरला शंकरशेठ रोडवरील चहाच्या टपरीवर लाच घेताना अटक करण्यात आली. तक्रारदार खाजगी कंत्राटी वाहनचालकाला महापालिकेच्या गाडीवर दररोज काम नेमून देण्याकरिता त्याने ही लाच घेतली. एसीबीचे पीआय वीरनाथ माने, पोलीस शिपाई रियाज शेख, माने, पांडुरंग माळी या पथकाने ही कारवाई केली. पीआय माने पुढील तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT