A unique cake cut by Ajit Pawar In Pune Sarkarnama
पुणे

Video Ajit Pawar : "मी अजित आशा-अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून..."; दादांचा वाढदिवस, कार्यकर्त्यांनी बनवला शपथविधी सोहळा!

A unique cake cut by Ajit Pawar In Pune : कालच्या अजितदादा प्रेमी कार्यकर्त्याच्या 'टॅटू'ची चर्चा सुरु असतानाच आता अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या अनोख्या केकची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

Jagdish Patil

Pune News, 21 July : राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. शिवाय अनेक कार्यकर्ते देखील दादांना भेटण्यासाठी गर्दी करत आहेत.

कालच एका कार्यकर्त्याने हातावर आपल्या फोटोचा टॅटू काढल्याचं पाहून अजित दादा भारावून गेले होते. 'तुमचं हे अनमोल प्रेम मला असंच राहू द्या, ते मला काम करण्याची ऊर्जा देतं.' अशा भावना देखील अजित पवारांनी 'एक्स'वर व्यक्त केल्या होत्या.

कालच्या कार्यकर्त्याच्या 'टॅटू'ची चर्चा सुरु असतानाच, आता पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) कार्यकर्त्यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या अनोख्या केकची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शिवाय या केकचा फोटो काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला.

उद्या 22 जुलै रोजी अजित पवारांचा (Ajit Pawar) वाढदिवस आहे. याच निमित्ताने आज काही समर्थकांनी दादांसाठी अनोखा केक आणला होता. या केकेवर अजित पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. "मी अजित आशा-अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की..." असा मजकूर या केकवर लिहिण्यात आला आहे.

हा केक कापून अजित पवारांनी उद्याचा वाढदिवस आजच साजरा केला. शिवाय हा केक कापताना त्यावरील मजकून वाचल्यानंतर अजितदादांच्या चेहऱ्यावरील उमटलेले स्मित हास्य देखील लपून राहिले नाही. त्यामुळे आपल्या मनातलं कार्यकर्त्यांने केकवर लिहिल्याचं पाहून अजित पवार देखील सुखावल्याचं पाहायला मिळालं.

खरंतर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा लपून राहिलेली नाही. अनेकदा त्यांनी आपल्या मनातील ही खदखद बोलून दाखवली आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्रीपदाचा योग अजित दादांच्या आयु्ष्यात आलेला नाही. आता राज्यात महायुती सरकार आहे आणि काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे.

त्यामुळे अजितदादांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्यात युतीचं सरकार पुन्हा एकदा आलं तर अजित पवार हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत ही त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. यासाठीच पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरात अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त केकवर "मी अजित आशा-अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की..." असा मजकूर लिहून तो केक कार्यकर्त्यांनी दादांना कापायला लावल्याचं पाहायला मिळालं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT