Kasba By-Election : कसबा पोटनिवडणुकीत बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांचा भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसण्याची मोठी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या काहीवेळापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. आता आपनेही कसबा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे.
आम आदमी पार्टी(Aap)ने महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतची माहिती आपच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे. त्यानुसार पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे अशी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभांची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार केला आहे.
कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहे. परंतू, या निवडणुकीत बंडखोरांनी महाविकास आघाडीची(MVA) धाकधूक वाढविली होती.मात्र, आता कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. कारण या निवडणुकीतून संभाजी ब्रिगेड आणि आपनं माघार घेतली आहे.
संभाजी ब्रिगेडचीही माघार...
संभाजी ब्रिगेड यांच्याकडून कसबा पेठ पोटनिवडणुकीत अविनाश मोहिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने लालमहल येथे राजमाता जिजाऊंना अभिवादन करून प्रचाराचा नारळ देखील फोडण्यात आला आहे. पण आता संभाजी ब्रिगेडला ठाकरे गटाकडून निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. या मागणीला यश आले असून मोहिते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.