Pune News
Pune News Sarkarnama
पुणे

Pune News : 'आप'चा उत्साह दुणावला : पुणे मनपावर झेंडा फडकण्याचा निर्धार!

सरकारनामा ब्युरो़

Pune News : दिल्ली महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित (MCD) निवडणुकांचे संपूर्ण निकाल आता हाती आले आहेत. दिल्ली महानगरपालिकेत मागील सलग पंधरा वर्षे भाजपची सत्ता होती. मात्र आता आम आदमी पक्षाने आता सत्ता खेचून आणले आहे. दिल्ली महानगरपालिकेतील एकूण 250 जागांपैकी आपने 134 जागा जिंकत बहुमताला गवसणी घातली. आपच्या या धमाकेदार विजयाचा जल्लोष पुण्यातही साजरा करण्यात आला.

पुण्यातील आम आदमी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील महानगरपालिकेतील विजयाचा आनंद साजरा केला. पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात आपच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. आपचे महाराष्ट्र राज्य संघटक विजय कुंभार, पुणे शहर अध्यक्ष अभिजीत मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे, लाडू भरवत विजयोत्सव साजरा केला. यानंतर पुण्यात विजयी रॅली काढण्यात आली.

आपने दिल्ली विधानसभा सलग दोन वेळा जिंकली, यानंतर त्यांनी पंजाब राज्यात सत्ता आणली.आता दिल्ली महानगरपालिकेतही सत्ता मिळवली. यामुळे आम आदमी पार्टीचा उत्साह दुणावला आहे. आगामी काळात पुणे महानगर पालिकेवर आपचा झेंडा फडकेल, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT