Narendra Modi Sarkarnama
पुणे

AAP Attack On Narendra Modi : नरेंद्र मोदी हे फक्त अदानींचे पंतप्रधान; आपची भाजपवर सडकून टीका

उत्तम कुटे: सरकारनामा

Pune Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात उद्योगपती गौतम अदानी हा एक माणूस सोडून बाकी कोणी सुखी नाही, असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान विदर्भात लगावला होता. तोच सूर पकडत आम आदमी पक्षानेही (आप) मोदी हे फक्त उद्योगपती अदानीचे पंतप्रधान आहेत, असा हल्लाबोल योगायोगाने सोमवारीच पुण्यात केला. (Latest Political News)

आपचे खासदार संजयसिंह यांनी महासंकल्प जनसभेत बोलताना नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजप व त्यांच्या केंद्रातील सरकारवर सडकून टीका केली. भाजपने जनतेला एकमेकांशी जातींच्या आधारे फक्त लढवायचे काम केले आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या जनविरोधी धोरणांवर, मोदींच्या हुकूमशाही कारभारावर, देशभरामध्ये द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींवर, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारीवर त्यांनी सवाल केले. मोदींना फक्त ईडी, सीबीआयच्या जिवावर सरकार बनवायची सवय लागली आहे, अशी तोफ त्यांनी डागली.

अदानीने सर्व देशच विकत घेतला आहे, असे म्हणत आकाशात गेले विमान अदानीचे, समुद्र अदानीचा, कोळसा अदानीचा यामुळे मोदी फक्त अदानीचे पंतप्रधान आहेत, अशी बोचरी टीका संजयसिंहानी केली. भाजपच्या सरकारमध्ये शेतकरी आज चिंतेत आहे. 'आम आदमी' महागाईने खाईत लोटला गेला आहे. त्यामुळे भाजपच्या डोक्यात गेलेली सत्तेची लालसा आपल्याला झाडूने साफ करायची आहे.

महाराष्ट्रातही 'पेपर लीक' होत आहेत. सर्वत्र भ्रष्टाचार फोफावला आहे म्हणून व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी आप महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविणार आहे, असे ते म्हणाले. दिल्ली आणि पंजाबमध्ये जसे सत्तापरिवर्तन झाले, तसे ते महाराष्ट्रातही नक्की होईल, असा दावा त्यांनी केला. (Maharashtra Political News)

मतदान केले, त्यांनी आम्हाला फक्त काळोख दिला, असा घणाघात आपचे प्रदेश प्रभारी गोपाल इटालिया यांनी केला. त्यामुळे आता चांगले शिक्षण, दवाखान्यांची आवश्यकता आहे, अरविंद केजरीवालांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनवायचा आहे, असे ते म्हणाले. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार, धनंजय शिंदे, संघटक मंत्री अजित फाटके, संदीप देसाई, नविंदर अहलुवालिया, रियाज पठाण, अजित खोत, हनुमंत चाटे, मनीष मोडक, भूषण धाकुलकर, राज्य मीडिया प्रमुख चंदन पवार, सोशल मीडिया प्रमुख कनिष्क जाधव, मुकुंद किर्दत आदी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT