Manoj Jarange News : मोठी बातमी! जरांगेंचे उपोषण महिनाभरासाठी मागे, पण आंदोलन सुरूच; समाजावरील बालंट टाळण्यासाठी निर्णय

Maharashtra Politics : न्यायालयात मराठा आरक्षण टिकण्यासाठी अभ्यास करून निर्णय घेण्याकरिता सरकारला महिन्याचा वेळ
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मराठवाड्यातील सरसकट मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करून उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सरकारचा आदेश धुडकावला. मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकवण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने एका महिन्याचा वेळ मागितला आहे.

यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करताना जरांगे यांनी मराठ्यांवर खापर फुटू नये, यासाठी सरकारला एका महिन्याचा वेळ देत दोन पावले मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसेच महिन्यानंतर काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. (Latest Political News)

Manoj Jarange
Ajit Pawar News : अजितदादांचा दीड-दोन महिन्यांतच देवेंद्र फडणवीसांना ‘शाॅक’! नेमकं काय झालं?

सरकारच्या वतीने माजी मंत्री अर्जुन खोतकर कायम जरांगेंच्या संपर्कात आहेत. आंदोलनावर ठाम राहिलेल्या जरांगेंना अनेक मंत्र्यांसह संभाजी भिडे यांनी बुधवारी उपोषण थांबवण्याचे आवाहन केले. यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करताना मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठ्यांवर खापर फुटू नये, यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ देत दोन पावले मागे घेण्याचा निर्णय घेतला.

महिन्यानंतर काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल. लाठीचार्ज करून समाजातील लोकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची मुख्य अटीसह इतर मागण्याही जरांगेंनी सरकारकडे केल्या. तसेच वेळ देऊनही सरकारने निर्णय घेण्यास दिरंगाई केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. (Maharashtra Political News)

निजामशाहीत नोंदी असलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊ, असा जीआर एका दिवसात काढला. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदेंच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन केली. मात्र, सरकारचा हा आदेश अमान्य करत जरांगेंनी गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषण सुरू ठेवले. यानंतर बुधवारी समाजाशी चर्चा करताना जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे की नाही, याबाबत संभ्रम असल्याचे सांगून महिनाभर उपाेषण थांबवून आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

'वेळ दिला नाही तर सरकार मराठा समाजावर खापर फोडेल, हे टाळण्यासाठी महिन्याचा वेळ द्यायचा की नाही', असा प्रश्न विचारताच ग्रामस्थांनी "हो" असे उत्तर दिले. या वेळी जरांगेंनी 'महिनाभरासाठी उपोषण थांबवत असलो तरी आंदोलनाची जागा सोडणार नसल्या'चे स्पष्ट केले.'

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange
Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले, महिन्याचा वेळ दिल्यानंतर....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com