Pune News : नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या मुलाला सोडून परत जात असताना समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी आणि मुलीचा खासगी आरामदायी बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. (Accident on Samrudhhi Highway: Death of girl along with husband and wife in Pune)
या अपघातात पुणे (Pune) जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील गंगावणे कुटुंबीयांवर तसेच पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयावर शोककळा पसरली आहे. प्रा. कैलास गंगावणे (वय ४८), त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय ३८) आणि मुलगी सई गंगावणे (वय २०) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत.
गंगावणे यांच्या मुलाला नागपूरमधील (Nagpur) विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता, त्याला महाविद्यालयात सोडून हे गंगावणे कुटुंबीय नागपूरहून पुण्याकडे विदर्भ ट्रॅव्हल्स बसने निघाले होते. बस दुभाजकाला धडकून उलटली. त्यानंतर बसला आग लागली. आतमधील आठ प्रवासी काचा फोडून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले; परंतु २६ प्रवाशांना बाहेर पडता आले नाही, तिघांचाही बसमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.
या २६ प्रवाशांमध्ये निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातील प्राध्यापक कैलास गंगावणे, पत्नी कांचन गंगावणे व मुलगी सई गंगावणे यांचा समावेश होता. कैलास गंगावणे यांचं मूळ गाव शिरूर असून ते निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात गेली २७ वर्ष प्राध्यापक म्हणून काम करत होते. सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थीनी होती, तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. ती मेडिकलची विद्यार्थिनी होती. या तिघांचाही फोन लागत नसल्याने गंगावणे यांचे मेहुणे अमर काळे यांनी शोध सुरू केला.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांनीही तातडीने हालचाल करून या अपघाताबाबत बुलडाण्याच्या पोलिस अधीक्षकांची संपर्क साधून तातडीने माहिती घेतली. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीत या तिघांचेही नाव असून त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघात स्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, असे स्पष्ट झाले आहे. गंगावणे कुटुंबीय याच बसमधून प्रवास करत होते या वृत्तास त्यांचे नातेवाईक काळे कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.