Pune News : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडे याने शिरूर येथील अजित पवार यांच्या पक्षातील आमदाराचा फोटो व्हाट्सअप डीपीला ठेवला होता. तसेच आमदारांच्या बॅनरवर देखील त्याचा फोटो असल्याचा समोर आला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी या आरोपीचे कोणाकोणाची हितसंबंध आहेत हे शोधण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
स्वारगेट बसस्थानकातील (Swargate Rape Case) अत्याचाराच्या घटनाप्रकरणातील आरोपी हा दत्तात्रेय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाट येथील रहिवाशी असल्याचं समोर आला आहे. शिवाय तो शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा कार्यकर्त्याचा असल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यावर माऊली कटके यांनी खुलासा करत या आरोपीशी आपला कोणताही संबंध नसल्याचा स्पष्ट केला आहे.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. अशोक पवार म्हणाले, आरोपीने स्वारगेट बस स्थानकामध्ये मृणास्पद काम केला आहे. त्याला तात्काळ पकडणे आवश्यक आहे
तसेच हा आरोपी उज्जैन यात्रेसाठी कोणाला मदत करत होता. कोणत्या महिला भगिनींना यात्रेला नेत होता. याची सखोल चौकशी पोलीस खात्याने केली पाहिजे. आरोपीचे हितसंबंध कोणाकोणाची होते ते देखील पोलिसांनी तातडीने शोधलं पाहिजे.
तसेच उज्जैन यात्रेनिमित्त तो कोणाकोणाच्या संपर्कात आला होता हे देखील शोधणे महत्त्वाचा आहे. आणि त्याचे ज्यांच्या सोबत हितसंबंध आहेत त्यांच्यावर देखील काही कारवाई करता येते का? याचा देखील प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे.
या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा फोन पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या हितसंबंधांंबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच अशा आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी असे देखील मागणी पवार यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.