
Prakash Ambedkar News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून तब्बल 1500 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र, जर दीड दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल होत असेल तर समजून जायचे की हे आरोपत्र आरोपीला सोडवण्यासाठीच आहे, असा धक्कादायक दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, दीड हजार पानाचं आरोपपात्र वाचनासाठी वकील आणि न्यायाधीस यांना देखील वेळ नाही. त्यामुळे आरोपींना सोडवण्यासाठी हे आरोपपात्र दाखल केले आहे.
उज्वल निकम यांची संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, देशमुख कुटुंबाने ज्या वकीलाची मागणी केली असेल तोच वकील सरकारने दिला असेल. पण त्यांनी मागणी केली होती की नाही हे मला माहीत नाही.
देशमुख कुटुंबीयांनी सरकारी वकील नेमू नये. देशमुख कुटुंबीयांनी वकील सूचवला पाहिजे. मी त्यांना म्हटले होते की तुम्ही वकील सुचवा आम्ही त्याच्या नियुक्तीसाठी सरकारकडे पाठपुरावा करू. त्यांनी शासनाला कळवले पाहिजे की त्यांना कोणता वकील हवा आहे. म्हणजे शासनाला बोलता येईल की देशमुख कुटुंबाने जो वकील सुचवला आहे तो द्या. त्यांनी उज्वल निकमांची मागणी केली असेल तर योग्य मागणी आहे. कारण कुटुंबानेच ती मागणी केली आहे.मात्र, कुटुंबाकडून त्यांची मागणी होती का? या विषयी मला माहिती नाही.
आरोपींनी हत्येसाठी वापरलेली शस्त्रे कोणती? हल्ला कसा झाला? हत्येची वेळ आणि ठिकाण कोणते? हेही दोषारोप पत्रातून उघड होईल. तसेच, आरोपी फरार होण्यात कोणाच्या मदतीने यशस्वी झाले आणि त्यानंतर ते कुठे लपले होते? याचाही तपास करण्यात आला आहे. याशिवाय, कुठल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला? याचाही तपास सीआयडीने केला आहे. याच प्रकरणाशी संबंधित खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांमध्ये काही संबंध आहे का? याचाही तपास करण्यात आला आहे. त्यामुळे याचा समावेश आरोपपत्रामध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.