Tushar Kamthe NCP  Sarkarnama
पुणे

NCP-BJP Politics : 'बारामती अॅग्रो'वर कारवाई : राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा भाजपाला खुला इशारा; याचं उत्तर लवकरच देऊ...

उत्तम कुटे

Pimpri-Chinchwad Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या इंदापूर येथील बारामती अॅ ग्रो प्लांट ७२ तासांत बंद करण्याची नोटीस `एमपीसीबी`ने बजावली. रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच ही कारवाई झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण दिसत आहे. त्यांच्यावरील या कारवाईच्या विरोधात शुक्रवारी (ता.२९) सायंकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार निदर्शने करीत राज्य सरकारचा निषेध केला.

तसेच रोहित पवारांना वाढदिवशी दिलेल्या गिफ्टचे रिटर्न गिफ्ट आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत सरकारला निश्चित देऊ, असा इशारा राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष तुषार कामठे यांनी दिला. तसेच चुकीच्या कामाबद्दल भाजपावर सडकून टीका करणारे रोहित पवार हे युवकांचा आवाज आहेत. तो कितीही दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला, तरी तो दाबला जाणार नाही, असंही कामठेंनी भाजपाला ठणकावून सांगितले.

प्रदूषण करणाऱ्या इतर किती कारखान्यांना अशा नोटिसा दिल्या आहेत. त्या दाखविण्याचे आव्हान त्यांनी एमपीसीबीला दिले. गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाच्या राजवटीत प्रदूषणाचे अनेक प्रश्न मांडले, पण त्यावर मात्र ही अशी कारवाई झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ही नोटिशीची कारवाई राजकीय सूडबुद्धीने, पवार कुटुंबीयांना त्रास देण्यासाठी केल्याचा आरोप कामठे यांनी या वेळी केला.

तसेच `नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी` `या राज्य आणि केंद्र सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय`, `रोहितदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है`अशी जोरदार घोषणाबाजी त्यांनी या वेळी केली. नंतर त्यांनी गणपतीची आरती करून सरकारला सद्गबुद्धी द्यावी, असे साकडे घातले.

आमदार रोहित पवार यांनी विविध प्रश्न राज्य सरकारला विचारले होते. त्याची उत्तरे देणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे आ. रोहित पवारांना आणि अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सूडबुद्धीने त्रास देण्याच्या उद्देशाने रोहित पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मध्यरात्री दोन वाजता नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप शिलवंत-धर यांनी केला. याचवेळी, एवढी कार्यतत्परता प्रशासनाने,जर सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दाखवली असती, तर बरे झाले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT