Maval News Sarkarnama
पुणे

Maval News : स्वातंत्र्यानंतर ७६ वर्षांनी मावळातील ठाकर समाजाला प्रथमच मिळाले जातीचे दाखले

Mla Sunil Shelke News : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होईपर्यंत जातीचा दाखला मिळाला नव्हता.

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Chinchwad News : मावळ (जि. पुणे) तालुक्यातील इंदोरी व सुदुंबरे येथील २८४ ठाकर बांधवांच्या दृष्टीने स्वांतत्र्यदिन खूप लकी ठरला. कारण त्यांना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होईपर्यंत जातीचा दाखला मिळाला नव्हता. तो मंगळवारी (ता. १५) स्वातंत्र्यानंतर प्रथमच मिळाला.

सुदुंबरे येथील ठाकर वस्तीवर जाऊन मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी हे दाखले वाटप केले. त्यातून खरंच शासन आपल्या दारी आल्याचे तेथील ठाकर समाजाला वाटले. तर, इंदोरी येथील हनुमान मंदिरात स्थानिक ठाकर बांधवांना त्यांची ही अधिकृत ओळख देण्यात आली. मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांच्या माध्यमातून आदिम सेवा अभियानांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.

आमदार शेळके, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, मंडलाधिकारी बजरंग मेकाले, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, दिपक हुलावळे, सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच धनश्री शिंदे व आजी-माजी सरपंच, सदस्य, ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही ठाकर समाजातील अनेकांकांकडे जातीचा दाखला नाही.

शैक्षणिक तसेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तो आवश्यक असतो. परंतू ज्यांचे पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर आणि भूमीहीन होते, अशा या समाजाला जात प्रमाणपत्र काढण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो. दुसरीकडे ते मिळत नसल्याने त्यांना शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते. हे नेमके हेरून आमदार शेळकेंनी तालुक्यातील वाडी-वस्तीवर जाऊन कागदपत्रांची पूर्तता करुन घेतली.

सरकार दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हे दाखले उपलब्ध करून दिले. त्याबद्दल ते मिळालेल्यांनी समाधान व्यक्त केले. ठाकर समाज सक्षम होण्यासाठी प्रयत्न करीत असून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना पाठबळ देणे हे माझे कर्तव्य आहे, असे शेळके यावर म्हणाले. माझ्या ठाकर बांधवांना त्यांचा अधिकार मिळाला, याचे समाधान आहे. आश्वासने न देता ती प्रत्यक्षात सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT