Pune Police Sarkarnama
पुणे

कारागृहातून सुटल्यानंतर काढलेली मिरवणूक आली अंगलट

मिरवणूक काढल्याच्या कारणामुळे खंडणी विरोधी पथकाने मुख्य आरोपीसह तिघांना बेड्या ठोकल्या.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : येरवडा कारागृहातून जामीनावर सुटल्यानंतर गुन्हेगाराची त्याच्या साथीदारांनी काढलेली दुचाकी मिरवणुक गुन्हेगारासह साथीदारांनाही चांगलीच अंगलट आली. मिरवणूक काढल्याच्या कारणामुळे खंडणी विरोधी पथकाने मुख्य आरोपीसह तिघांना बेड्या ठोकल्या.

वैभव ऊर्फ पप्या शांताराम उकरे (वय 23, रा. कर्वेनगर), सुयश ऊर्फ मनोज संजय दिघे (वय 22, रा.कर्वेनगर), आशिष ऊर्फ शुटर मच्छिंद्र माने (वय 22, वडारवस्ती, कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उकरे विरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यातच उकरे व त्याचा साथीदार कारागृहात होता. दरम्यान, त्याचा व त्याच्या साथीदाराला 8 ऑक्‍टोबर रोजी जामीन मिळाला होता. त्यानंतर वैभव, सुयश, आशिष यांच्यासह 30 ते 35 जणांच्या टोळक्‍याने येरवडा कारागृह ते कर्वेनगरपर्यंत दुचाकीवर रॅली काढली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आरोपी पसार झाले.

दरम्यान, मिरवणूक काढणारा वैभव उकरे, मनोज दिघे कोहे दोघेही कोथरूड परिसरात येणार आल्याची माहिती पोलिस कर्मचारी पांडुरंग वांजळे व यशवंत ओंबासे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना सापळा रचून पकडले. त्यांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी तिसरा आरोपी आशिष माने यास वडारवस्ती परिसरातून अटक केली.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT