आमची आघाडी शिवसेनेशी; शिवतारेंशी नाही

मागच्या पाच वर्षात पुरंदरवासियांना केवळ स्वप्नं दाखविण्यात आली. प्रत्यक्षात काहीच झाले नाही.
आमदार संजय जगताप
आमदार संजय जगतापसरकारनामा

पुणे : राज्यात महाविकास आघाडी राज्यात खऱ्या अर्थाने कुठे रूजली असेल तर ती पुरंदर विधानसभा मतदारसंघात.गेल्या दोन वर्षात मतदारसंघात अनेक विकास कामे होत आहेत.आघाडीतील शिवसेनेसह सर्व पक्षांशी आमचे चांगले संबंध आहेत.मात्र, आमची युती शिवसेनेशी आहे. विजय शिवतारे यांच्याशी नाही, असे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचा शिवसैनिक, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात चांगला समन्वय आहे. हातात हात घालून आम्ही काम करतोय.राज्यात तीन पक्षांमध्ये सर्वात चांगला समन्वय पुरंदर तालुक्यात आहे, असा दावा आमदार जगताप यांनी केला.पक्ष वाढविण्याचा, विस्तार करण्याचा आधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येक पक्ष आपली संघटना वाढविण्याचा प्रयत्न करीत असतो. जिल्हाध्यक्ष या नात्याने कॉंग्रेस पक्ष वाढविण्याचा प्रयत्न मी करणार आहे, असेही आमदार जगताप यांनी सांगितले.

आमदार संजय जगताप
भाजपाचे आमदार सिद्धार्थ शिराळेंचा राष्ट्रवादीतील हा नेता आवडता...

दिवाळीनिमित्त ‘सरकारनामा’ घेतलेल्या विशेष मुलाखतीत आमदार जगताप बोलत होते. ते म्हणाले, ‘‘ मागच्या पाच वर्षात पुरंदरवासियांना केवळ स्वप्नं दाखविण्यात आली. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. गेल्या दोन वर्षात पुरंदरमधील विकासाकामांनी गती घेतली आहे.अगदी दुष्काळी असलेला तालुका आता बागायती होऊ लागला आहे.याआधी पुरंदरचा विकास केवळ भाषणात झाला. प्रत्यक्षात काहीच झाले नाही.आता मात्र, अनेक कामांचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या काही महिन्यात प्रत्यक्षात कामे दिसू लागतील.’’

विमानतळाबाबत शिवतारे यांनी संदर्भहीन चर्चा केली. आता तो प्रश्‍नदेखील योग्यपणे मार्गी लागला आहे. गुंजवणीच्या पाणी योजनेला माझा कधीच विरोध नव्हता. या योजनेचा उपयोग शेतकऱ्यांना व्हायला हवा, अशी माझी भूमिका होती व आहे. त्यामुळे ‘एलॲन्डटी’ या कंपनीला व त्यांच्या कंत्राटदाराला आमचा विरोध होता, असे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.

आमदार संजय जगताप
पुण्यात कसब्यातील महिला मतदारांची जिल्ह्यात आघाडी

मला त्रास दिला जातोय, अशी भूमिका माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मांडली होती. या संदर्भात विचारले असता, जगताप म्हणाले, ‘‘ त्रास कुणीच देत नाही.ते स्वत: त्रास करून घेत आहेत.आम्ही केवळ पुरंदरच्या विकासावर बोलत आहोत. तालुक्यातील कामे प्राधान्याने झाली पाहिजेत ही आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येक कामाचा पाठपुरावा करीत आहोत.’’

पुरंदरची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू आहे. पक्ष म्हणून माझ्या पक्षाचा विस्तार झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. त्यासाठी मी काम करतोय.पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्ह्यात आणि तालुक्यता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे ही माझी जबाबदारी आहे. त्या दृष्टीकोनातून मी काम करीत आहे, असे आमदार जगताप यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com