Moshi Hoarding Sarakarnama
पुणे

Hoarding Collapse : मोठी बातमी! मुंबईपाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही 'होर्डिंग दुर्घटना'

Moshi Hoarding : मोशीतील जय गणेश इम्पिया चौकातील रस्त्याच्या कडेला असेलेले होर्डिंग पडलं आहे

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Chinchwad News : मुंबईतील घाटकोपर भागात सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे एक मोठं अनधिकृत होर्डिंग पेट्रोल पंपावर पडलं आणि मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 16 जणांचा जीव गेल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली गेली आहे.

परंतु या दुर्घटनेला दोन दिवसही होत नाही तोच गुरुवारी पिंपरी-चिंचवड परिसरातही वादळी वारा आणि पावसामुळे एक भलं मोठं होर्डिंग पडल्याची घटना घडली आहे.

सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे गुरुवारी पिंपरी-चिंचवड परिसरात सर्वत्र दाणादाण उडाली. तर या भागाच्या लगत असलेल्या मोशी परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेले मोठे होर्डिंग कोसळलं. दुपारी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हे होर्डिंग रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांवर पडल्याने वाहनांचे मोठे नुकसाना झाले. परंतु सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घ़डली होती.सोमवारी(ता.13) दुपारी धुळीचे वादळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली.त्यात पेट्रोलपंपावर अनधिकृत 120 स्क्वेअर फुटाचे होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटना घडून त्यात आत्तापर्यंत तब्बल 16 जणांचा बळी गेला आहे.या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या भावेश भिंडेला आता राजस्थानमध्ये उदयपूरमधून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासह दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. तसेच, अनधिकृत होर्डिंग काढण्यात यावे, असे निर्देष मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT