Bhavesh Bhinde Arrested: मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

Ghatkopar Hording Collapse Accident : घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनाप्रकरणी पंतनगर पोलिसांनी भावेश भिंडे याच्यासह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Bhavesh Bhinde Arrested
Bhavesh Bhinde ArrestedSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घ़डली होती. सोमवारी(ता.13) दुपारी धुळीचे वादळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. त्यात पेट्रोलपंपावर अनधिकृत 120 स्क्वेअर फुटाचे होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटना घडून त्यात आत्तापर्यंत तब्बल 17 जणांचा बळी गेला आहे. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या भावेश भिंडेला आता राजस्थानमध्ये उदयपूरमधून अटक करण्यात आली आहे. (Ghatkopar hoarding collapse)

Bhavesh Bhinde Arrested
Uddhav Thackeray News : '4 तारखेला फक्त नरेंद्र मोदी राहतील, 'डीमोदीनेशन', उद्धव ठाकरे काय म्हणाले...

घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनाप्रकरणी पंतनगर पोलिसांनी भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) याच्यासह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे होर्डिंग लावले होते. भावेश हा या कंपनीचा संचालक आहे. त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

तो मुलुंड परिसरात राहतो. मात्र,होर्डिग पडल्यानंतर त्याला पोलिस पकडण्यासाठी गेले असता तो फरार झाला.पण आता गुरुवारी पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले असून भावेशला उदयपूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

घाटकोपरमधील दुर्घटनेत 17 लोकांना जीव गमवावा लागला होता.तसेच 75 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या दुर्घटनेनंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं.त्यामुळे या दुर्घटनेवरून आरोप -प्रत्यारोपांनी राजकारण ढवळून निघालं होतं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या दुर्घटनेनंतर एकीकडे युध्दपातळीवर बचावकार्य सुरू होते. तर दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी भावेश भिंडेच्या शोधासाठी पोलिस प्रशासन यंत्रणा दिवसरात्र झटत होती. त्याच्या मागावर मुंबई पोलिसांची तब्बल 7 पथकं तैनात होती. भिंडेचं अखेरचं लोकेशन लोणावळ्यात आढळून आले होते.

त्यामुळे पोलिसांना तो परराज्यात पळून गेल्याचा दाट संशय होता.त्यामुळे पोलिसांनी आपली तपासपथकं वेगवेगळ्या भागात रवाना केले होते. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले अन् त्याला गुरुवारी राजस्थानमधून अटक केली.

Bhavesh Bhinde Arrested
Raebareli Lok Sabha: काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची फिल्डिंग, राहुल गांधींविरोधात मोठी फौज रिंगणात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com