Narayan Rane, Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

Video Shivsena UBT : 'चार आणे, बारा आणे, अटक करा नारायण राणे!' मालवणमधील राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक

Sudesh Mitkar

Pune News, 29 August : छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग येथील पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर मविआच्या नेत्यांसह शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यावेळी भाजप खासदार नारायण राणे यांनी ठाकरेंची वाट अडवली शिवाय अकांडतांडव करून स्थानिकांना धमकी दिली.

याच घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून नारायण राणेंच्या (Narayan Rane) फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांनी सहभागी होत. 'चार आणे बारा आणे अटक करा नारायण राणे' आशा घोषणा दिल्या.

या आंदोलनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते भेट द्यायला गेले. यावेळी ज्या पद्धतीने सरकारने हे आंदोलन हाताळलं त्यावरून सरकारला कोणतेही आंदोलन व्यवस्थित हाताळता येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सरकारला आंदोलन हाताळण्यापेक्षा ते चिघळवण्यात जास्त रस आहे."

तसंच, मराठा आंदोलन, आळंदीतील वारकरी आंदोलन, बदलापूर येथील अत्याचाराविरोधीतील पालकांचे आंदोलन आणि कालचे मालवण (Malvan) येथील आंदोलन हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरलं असून या सर्व आंदोलनावर फक्त सरकारला लाठी हल्ला आणि अश्रुधुराचा वापर करून ती चिघळवण्यात रस असल्याचं स्पष्ट झाला आहे.

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळळ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र, त्यांनी तसं काही केलं नाही. तत्पूर्वी जो पुतळा उभारण्यात आला त्याबाबत इतिहास संशोधकांनी यापूर्वीच आक्षेप घेतला होता. कोणताही पुतळा उभारण्यापूर्वी कला संचालनायालयाची परवानगी घेणे आवश्यक असते.

त्या पद्धतीची परवानगी या पुतळ्याबाबत घेण्यात आली होती का? असा सवाल करत त्यांनी याबाबतचे उत्तर फडणवीसांनी द्यावं अशी मागणी केली. दरम्यान, हा पुतळा उभारण्याची जबाबदारी ज्या जयदीप आपटेला देण्यात आली होती. त्याचे सनातन प्रभातशी संबंध असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्या व्यक्तीला इतका मोठा पुतळा उभारण्याचा कोणताही अनुभव नसताना हा त्याला कामाची परवानगी कशी दिली? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

तसेच आपटेचा आमदार नितीश राणेंसोबतचा फोटो समोर आला आहे. या दोघांचं नेमकं कनेक्शन काय हे देखील समोर येणं आवश्यक आहे. या सर्व प्रकरणांमध्ये खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश आणि नितेश राणे यांनी ज्या पद्धतीने गुंडागर्दी केली. त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे का नाही.

याबाबत सरकारने उत्तर देणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकार नौदलाकडे हात दाखवला आहे. असे असेल तर या नौसेनेचे प्रमुख म्हणून भाजप नेते राजनाथ सिंग हे आहेत. त्यामुळे यांना तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहात का? असा प्रश्न उपस्थित करत याचे स्पष्टीकरण फडणवीसांनी द्यावं अशी मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT