Rohit Pawar On Statue Collapse: रोहित पवारांनी सांगितला महायुती सरकारचा 'हा' दळभद्री कार्यक्रम!'

NCP SharadChandra Pawar Political News: आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी दोन कोटी चाळीस लाखांचा खर्च आला असताना उद्घाटनासाठी उभारण्यात आलेले तात्पुरत्या हेलिपॅड बनवण्याचा खर्च...
Rohit Pawar on mahayuti.jpg
Rohit Pawar on mahayuti.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे. हा पुतळा उभारताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला त्यामुळे निकृष्ट दर्जाचं काम झालं त्यामुळेच हा पुतळ्या कोसळण्याची नामुष्की ओढावली असल्याची टीका सातत्याने विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक खळबळ जनक दावा केला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी दोन कोटी चाळीस लाखांचा खर्च आला असताना उद्घाटनासाठी उभारण्यात आलेले तात्पुरत्या हेलिपॅड बनवण्याचा खर्च दोन कोटी करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती. याच हेलिपॅड चा वापर करून ही नेते मंडळी या ठिकाणी पोचली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 35 फूट उंच पुतळ्या सोसाट्याच्या वाऱ्यात सोमवारच्या सकाळी अचानक कोसळला. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आठ महिन्यापूर्वी 4 डिसेंबर 2023 रोजी नेवी डे निमित्त करण्यात आले होते. सरकारकडून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.

दरम्यान, आता या उभारण्यात आलेल्या पुतळ्याबाबत विविध गोष्टी पुढे येत आहेत. इतिहास संशोधकांनी या पुतळ्याच्या रचनेवर आक्षेप घेतला आहे. तसेच या पुतळा उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरती दाखवण्यात आलेल्या खुणेवरून देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

Rohit Pawar on mahayuti.jpg
Ambadas Danve News: '...छत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ ओरडणे यात फरक!'; दानवेंचा चिमटा

आता या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक वेगळा दावा केला आहे. सोशल मीडिया पोस्ट करत रोहित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 2.40 कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे 2.02 कोटी... वारे व्वा सरकार! घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल.

78 लाख, 44 लाख आणि 79 लाख असा खर्च तीन तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी राज्य सरकारने केला. सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टेंडर डिसेंबर 2023 मध्ये निघालं आणि वर्क ऑर्डर मात्र दोन महिने आधीच सप्टेबर 2023 मध्ये देण्यात आल्या. याचाच अर्थ गाव वसण्याआधीच लुटेरे हजर होते.

तात्पुरतं हेलिपॅड उभारण्यासाठी एवढा खर्च येतो का आणि दलाली खाण्यासाठी एवढ्या किमतीचं टेंडर काढलं जातं का? यावर संशोधन होणं गरजेचं आहे. राज्य सरकारने यावर उत्तर द्यावं!अस रोहित पवार या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहेत.

Rohit Pawar on mahayuti.jpg
Porsche Car Accident: 'कार'नामा करणाऱ्या बाळाला भूर्र उडून जायचंय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com