Ambadas Danve News : निष्क्रिय गृहमंत्र्यांमुळे पोलिसांवर आमदाराची गाडी धुण्याची वेळ..

Shiv Sena leader Ambadas Danve criticized Fadnavis's home affairs : या फोटोने एकच खळबळ उडाली असून सत्तेचा दुरुपयोग करत आमदार पोलिसांना कशी हीन वागणूक देत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला, मुली, विद्यार्थीनींवरील वाढते अत्याचार यावरून महायुतीचे सरकार विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या निशाण्यावर आहे.
Ambadas Danve-MLA Sanjay Gaikwad
Ambadas Danve-MLA Sanjay GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT Political News : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर सत्ताधारी पक्षाचे खासदार नारायण राणे व त्यांचे सुपुत्र निलेश राणे पोलिसांच्या अंगावर धावून गेले. यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या विभागावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे बुलडाण्याचे संजय गायकवाड यांची गाडी एक पोलिस कर्मचारी पाणी टाकून धुऊन काढत असल्याचा कथित फोटो शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मिडियावर व्हायरल केला.

या फोटोने एकच खळबळ उडाली असून सत्तेचा दुरुपयोग करत आमदार पोलिसांना कशी हीन वागणूक देत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे. (Ambadas Danve) राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला, मुली, विद्यार्थीनींवरील वाढते अत्याचार यावरून महायुतीचे सरकार विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे गृहखाते सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे.

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर काल ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी राणे यांचे पुत्र नीलेश यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. यावरूनही सरकारवर टीका होत असताना दानवे यांनी व्हायरल केलेल्या फोटोवरून गदारोळ सुरू झाला आहे.

Ambadas Danve-MLA Sanjay Gaikwad
Rajkot Fort Incident News : राणेंच्या पोकळ धमक्या, शिवसैनिक घुसले असते तर त्यांचाच चेंदामेंदा झाला असता

अंबादास दानवे म्हणाले, पोलीसांवर कुत्र्यासारखा धावून जाणारा नपुसंक काल बघितलाच आपण. महाराष्ट्राचे गृहमंत्री एवढे निष्क्रिय की, आत्ता पोलिसांना सत्ताधारी आमदारांची गाडीपण धुऊन द्यायची वेळ आली. (Devendra Fadnavis) शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुताना महाराष्ट्र पोलिस. फडणवीसांनी पोलीसांची काय दुर्दशा करून ठेवलीय, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देतील का? असा सवाल या निमित्ताने दानवे यांनी उपस्थीत केला. बदलापूर येथील बालिकांवर अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात संतापाचे वातावरण आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस व त्यांचे गृहखाते सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com