Pune News, 07 August : बनावट दिव्यांग सर्टिफिकेट मिळवून आयएएस बनलेल्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांना यूपीएससीने दणका दिला आहे. त्यांचं IAS पद तात्पुरत स्थगित करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणानंतर प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली असून सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वच ठिकाणी अशा प्रकारच्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर होत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
पूजा खेडकर प्रकरणानंतर सर्वच प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या असून दिव्यांग प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्याचा निर्णय घेत आहेत. यासाठी आता पुणे (Pune) जिल्हा परिषद देखील अलर्ट मोडवर आली असून दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेणाऱ्या शिक्षकांची प्रमाणपत्र तपासण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. तपासणीतून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन काही सुविधांचा लाभ घेतला असल्यास जिल्हा परिषद प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
नाव बदलून, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून, बनावट ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा वापर करून यूपीएसएसी (UPSC) परीक्षा देऊन आयएएस पदापर्यंत पोहचलेल्या पूजा खेडकर यांच्या कारनाम्यानची चर्चा महाराष्ट्र आणि केंद्र शासनापर्यंत पोहोचल्यानंतर यूपीएससी व मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
केंद्र सरकारच्या समितीकडून करण्यात आलेल्या चौकशीनंतर जूलैमध्ये पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कार्यक्रम थांबवण्यात आला होता. खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर पुणे जिल्हा परिषद अलर्ट मोडवर आलं आहे. दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेणाऱ्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांच्या वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणी सुरु केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांनी बदली, व्यवसाय कर सुट, वाहन भत्ता, आयकर सुट आणि इतर सवलती मिळविण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवली असून यातील काही दिव्यांग प्रमाणपत्र ही बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शिक्षण विभागाने गट शिक्षण अधिकारी यांना पत्र लिहून मागवली आहे. जिल्ह्यातील 350 पेक्षा जास्त शिक्षकांनी शासकीय सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेतल्याची प्राथमिक माहिती असून आता पुन्हा तपासणी होणार असल्याने दिव्यांग लाभार्थी शिक्षकांना दणका बसण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.