Pooja Khedkar : पूजा खेडकरांच्या अडचणीत आणखी वाढ! आता जिल्हाधिकारी सुहास दिवसे उचलणार मोठं पाऊल

Suhas Diwase Vs Pooja Khedkar : एका चुकीमुळे पूजा खेडकर यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी केलेले सर्व गैरप्रकार समोर आले. अशातच आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Pooja Khedkar, Suhas Diwase
Pooja Khedkar, Suhas DiwaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 06 August : पुण्यातील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या 'कार'नाम्यांची महाराष्ट्रासह देशभर चर्चा झाली. त्यांनी केलेल्या विविध गैरप्रकाराची नोंद थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली.

शिवाय त्यांच्या बनावट प्रमाणपत्राचा विषय चर्चेत आल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) देखील खेडकर यांच्याविरोधात कडक कारवाई करत त्यांचं आयएएस पद तात्पुरते रद्द करण्याचा निर्णय घेतला.

एका चुकीमुळे पूजा खेडकर यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी केलेले सर्व गैरप्रकार समोर आले. अशातच आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण खेडकर या पुण्यात (Pune) प्रशिक्षणार्थी असताना त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता.

Pooja Khedkar, Suhas Diwase
Pooja Khedkar : 'यूपीएससी'ने रद्द केलेल्या नियुक्तीविरोधात पूजा खेडकर यांची हायकोर्टात धाव

त्यानंतर त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली. प्रमाणपत्राचा घोळ करुन UPSC मध्ये निवड झाल्याचे आरोप होत असतानाच त्यांनी पुणे जिल्हाधिकारी दिवसे यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. वाशिम पोलिस खेडकर यांच्या शासकीय विश्रामस्थळी चौकशीसाठी गेले असता त्यांनी हा आरोप केला.

या आरोपांची दखल घेत वाशिम पोलिसांनी तक्रार नोंद केली होती. याच मुद्द्यावरुन आता सुहास दिवसे पूजा खेडकरविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याची माहिती आहे. शिवाय आपली बदनामी केल्याचं सांगत दिवसे गुन्हासुद्धा दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Pooja Khedkar, Suhas Diwase
Ajit Pawar News : अजित पवार गटाच्या 'या' दहा आमदारांचे तिकीट 'कन्फर्म'; बाकी मंडळी 'वेटिंग'वर

प्रशिक्षणार्थी IAS पदाची निवड रद्द

'यूपीएससी'ने पूजा यांची प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी म्हणून केलेली निवड रद्द केली आहे. तसंच इथून पुढे आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेला बसण्यास त्यांना बंदी घालण्यात आली आहे. तसंच आयोगाने त्यांना अनेक वेळा बनावट ओळख वापरून परीक्षेत बसल्याबद्दल दोषी ठरवलं आहे.

त्यामुळे एका अंबर दिव्यामुळे आधी नोकरी गेली, नंतर कुटुंबीयांनी केलेले गैरप्रकार समोर आले, त्यात पोलिसांचा ससेमिरा मागे लागला आणि आता तर फरार व्हायची वेळ आलेल्या पूजा खेडकर यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com