Vasant More News, Raj Thackeray, Vasant More latest news
Vasant More News, Raj Thackeray, Vasant More latest news Sarkarnama
पुणे

मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर अखेर राज ठाकरेंचा मोरेंना प्रतिसाद; भेटीसाठी दिवस ठरला

सरकारनामा ब्युरो

पुणे : मशिदीवरील भोंग्याच्याबाबतीत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेवर माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच शहराध्यक्ष पदावरुनही त्यांना हटविल्यात आले आहे. यानंतर त्यांना अनेक पक्षाच्या ऑफर येत आहेत. मात्र "मी मनसेतमध्येच राहणार असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी काल राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळही मागितली होती. मात्र राज ठाकरे यांनी त्यासाठी आज सकाळपर्यंत प्रतिसाद दिला नव्हता. मात्र आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मोरे यांना फोन गेल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच राज ठाकरे यांनी मोरे यांना भेटीसाठी वेळ दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोरेंना आज फोन केला. ''शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा,'' अशी ऑफर मुख्यमंत्र्यांनी मोरेंना दिली असल्याचे सुत्रांनी सांगितले. याबाबतचे आज वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज ठाकरे यांचे निवासस्थान 'शिवतीर्थ'वरुन सूत्र हालली आणि त्यानंतर तात्काळ मोरे यांना फोन गेला. तसेच त्यांना भेटीसाठी सोमवारची वेळ देण्यात आली आहे. याबाबत बोलताना मी सोमवारी राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार असल्याचे मोरे यांनी सांगितले आहे.

तसेच ''माझ्या शहराध्यक्षपदाची मुदत एक वर्षाची होती. जी मार्चमध्ये संपली आहे. त्यामुळे नव्या शहराध्यक्षांची निवड झाली तरी काही बिघडत नाही. आमच्याकडे राज ठाकरे यांचा शब्द अंतिम असतो. वसंत मोरेंच्या निष्ठा अजूनही राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाण्यातल्या उत्तरसभेला मी जाणार आहे. तसेच वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. प्रत्येक पक्षाच्या लोकांना मी सांगत आहे की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य सरचिटणीस आहे. माझी हकालपट्टी झाली या शब्दावरून माझे कार्यकर्ते कालपासून नाराज आहेत. हकालपट्टी पक्षातून होते पदावरून नाही. म्हणूनच मनसेचा बॅच लावून आहे, असेही स्पष्टीकरण मोरे यांनी दिले आहे.

गेले दोन-चार दिवस या विषयावर मनसेमध्ये वाद सुरू होता. या पार्श्वभूमीवर पुण्यातील नाराज मनसे पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबू वागसकर, अनिल शिदोरे आणि साईनाथ बाबर यांना 'शिवतीर्थ'वर पाचारण होते. याच बैठकीनंतर वसंत मोरे यांना पदावरून हटवत नगरसेवक साईनाथ बाबर यांची नवे शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर मोरे यांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व पक्षांच्या ऑफर येवून गेल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT