शेट्टींना धन्यवाद म्हणून आमदार देवेंद्र भुयार १५ दिवसांतच राष्ट्रवादीच्या वाटेवर

Devendra Bhuyar | NCP | Raju Shetty : शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रक्षप्रवेश?
Devendra Bhuyar
Devendra BhuyarFacebook
Published on
Updated on

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी त्यांच्या पक्षाचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांची २४ मार्च रोजी, संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत हकालपट्टी केली आहे. ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला, आमदार देवेंद्र भुयारांसारख्या चुकीच्या व्यक्तीच्या पाठीशी उभा राहिलो, याबद्दल मला माफ करा आणि मी तुमची जाहीर माफी मागतो असे म्हणत शेट्टींनी त्यावेळी भुयार यांची हकालपट्टी केली होती. (Raju Shetty News)

या सर्व घडामोडीनंतर भुयार यांनी फेसबुक पोस्ट करत 'धन्यवाद' या एका शब्दात शेट्टी यांना उत्तर दिले होते. यामुळे त्यांनी संघटनेपासून सगळे संबंध तोडल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्या पुढील वाटचालीबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान आता देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. १० एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल असा संकेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होऊन २३ वर्षे झाली, मात्र विदर्भात म्हणावा तसा पक्ष वाढलेला नाही. त्यामुळे देवेंद्र भुयार यांच्या रुपाने राष्ट्रवादीचा विदर्भात पक्ष वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणूनही या प्रवेशाकडे पाहिलं जात आहे. शरद पवार देवेंद्र भुयार यांना विदर्भात मोठी जबाबदारी सोपवणार असल्याच्या चर्चा आहेत.

Devendra Bhuyar
शेतकरी असल्याने प्रेयसीचा नकार; प्रेमवीराची थेट मुख्यमंत्र्यांनाच साद

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके म्हणाले, देवेंद्र भुयार हे स्वाभिमानीचे आमदार होते. मात्र ते ज्या वरुड-मोरशी मतदारसंघातून आमदार आहेत, ती जागा राष्ट्रवादीसाठी राखीव होती. ते आजही विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी म्हणूनच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतृत्व नक्कीच त्यांच्या पक्षप्रवेशाचा विचार करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com