Ram Satpute JItendra Awhad Sarkarnama
पुणे

Ram Satpute : अफजलखानाच्या औलादींचा माज वाढतोय, जीतूद्दीन हिंदू धर्माला समजतो काय?; सातपुतेंची आव्हाडांवर जहरी टीका!

Ram Satpute News : "रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात."

सरकारनामा ब्यूरो

Ram Satpute : महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (JItendra Awhad) आणि वाद हे जणू काही समीकरणच झाले आहे. गेल्या वर्षी आव्हाड यांच्यावर हर हर महादेव या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना अटक झाली होती.

दरम्यान, एका महिलेने आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोपही केला होता. त्यामुळे व्यथित झालेले आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता.

आमदार आव्हाड यांनी देशात सण केवळ दंगली घडविण्यासाठीच साजरे केले जात असल्याचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) घाटकोपरमध्ये शुक्रवारी (ता. २१) सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, "रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात. दंगलीमुळे शहरांचे वातावरण अत्यंत विषारी झाले आहे. आगामी वर्ष हे धार्मिक दंगलीचे वर्ष असेल असे माझे स्पष्ट मत आहे." जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त शब्दांमुळे त्यांना महाराष्ट्र मानवाधिकार आयोगानेही नोटीस बजावली आहे.

Ram Satpute Tweet

आव्हाडांच्या याच वक्तव्यावर आता भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सातपुते ट्वीट करत म्हणाले, "या अफजलखानाच्या औलादींचा माज दिवसागणिक वाढतच चालला आहे. हिंदू देवी देवतांचा अपमान करणारा जीतूद्दीन हिंदू धर्माला समजतो तरी काय? स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पवित्र हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या या चिंपाट वर कारवाई झालीच पाहिजे," असे जहरी टीका त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT