Pachora News : शिंदे गटाचे आमदार म्हणाले, उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू!

बाजार समितीची एक इंचही जागा विकू देणार नाही अशी ग्वाही आमदार किशोर पाटील यांनी दिली.
MLA Kishor Patil
MLA Kishor PatilSarkarnama
Published on
Updated on

MLA Kishor Patil News : रविवारी उद्धव ठाकरे पाचोरा दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते आमदार माजी आमदार (स्व.) आर ओ तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. स्वर्गीय तात्या हे माझे राजकीय पिता व गुरू असून त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होत असल्याचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केले. (Uddhav Tjackeray will address public meeting in Pachora)

पाचोरा- भडगाव (Jalgaon) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC election) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Shivsena) युती धर्म पाळत शेतकरी विकास पॅनल गठित केले आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे पॅनेल (Mahavikas Aghadi) आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

MLA Kishor Patil
Nashik APMC News: देविदास पिंगळेंची विरोधकांवर मात, ३ संचालक बिनविरोध!

पाचोरा- भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी युती धर्म पाळत शेतकरी विकास पॅनल गठित केले असून सर्वच्या सर्व जागा जिंकू व बाजार समितीची जागा विक्रीचे स्वप्न पाहणाऱ्याच्या स्वप्नभंग करू. एक इंच ही जागा विकू देणार नाही व बाजार समितीला गत वैभव प्राप्त करून देणार असल्याची ग्वाही आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बाजार समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी नंतर आमदार किशोर पाटील यांनी शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात शिवसेना- भाजप युतीच्या शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांसमवेत पत्रकार परिषद घेतली.

MLA Kishor Patil
Amalner News: `त्या` आदेशाने ३८ माजी नगरसेवकांचे धाबे दणाणले!

यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, पूर्वजांचा ठेवा असलेली बाजार समिती तालुक्याचे वैभव असून गतकाळात आमची सत्ता असताना सुमारे १५ कोटींची विकास कामे केली. शेतकरी निवास, हमाल मापाडी निवास, माती परीक्षण केंद्र, वजन काटा, गोडाऊन, सर्व परिसराचे काँक्रिटीकरण, शेड,संरक्षक भिंत अशा उपयुक्त सुधारणा पाचोरा, भडगाव, वरखेडी ,कजगाव, नगरदेवळा येथील बाजार समितीत केल्या आहेत.

कायद्याचा चुकीचा अर्थ लावून संचालकांना अपात्र ठरवून सतीश शिंदे यांनी सभापती पद मिळवल्यानंतर विकास कामांचा खोळंबा झाला. त्यांनी काय कामे केली, हे त्यांनी जाहीर करावे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचा बहाणा करणाऱ्यांनी ४० हजार स्क्वेअर फूट बाजार समितीची जागा कशी मिळवली व आणखी सुमारे १२ कोटींची जागा अवघ्या चार कोटीत मिळवण्याचा घाट घातला आहे. या साऱ्या गोष्टी मतदारांना ठाऊक आहेत. या जागा विक्रीवर स्थगिती आणली असून एक इंचही जागा आता विकू देणार नाही असे स्पष्ट केले.

MLA Kishor Patil
Raver APMC election news : बच्चू कडूंनी स्वतंत्र चुल मांडल्याने भाजपला चिंता!

शेतकरी विकासासाठी आम्ही सज्ज आहोत बाजार समितीत दर महिन्याला एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने त्याच पैशातून बाजार समितीचे कर्ज फेडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान भाजपचे सदाशिव पाटील, मधुकर काटे, नंदू सोमवंशी यांना माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारून खरी भाजप कोणती याचा जाब विचारला असता जिल्हास्तरावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिवसेने सोबत असल्याचे व सहकारात पक्ष नसतो असे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांचे स्वागतच असून त्यांच्या सभेला कोणतेही गालबोट लागणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत, असे सांगून ठाकरेंच्या हस्ते रविवारी पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर सोमवारी (ता.२४) सकाळी माझ्यासह सर्व शिवसैनिक स्वर्गीय तात्यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून तेथे नतमस्तक होणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

MLA Kishor Patil
Sinnar APMC election News : माणिकराव कोकाटे विरूद्ध राजाभाऊ वाजे लढत!

यावेळी गणेश पाटील, राजेंद्र पाटील, जयवंत पाटील, नितीन पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, नरेंद्र पाटील, संजय पाटील, लकीचंद पाटील, मोहन पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील, प्रकाश तांबे, गोविंद मोर, मनोज सिसोदिया, युसूफ पटेल या उमेदवारांसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com