Abdul Sattar
Abdul Sattar  Sarkarnama
पुणे

Baramati : पवारांची पाॅवर कायम राहणार : अब्दुल सत्तारांनी केले कौतुक

कल्याण पाचंगणे

Abdul Sattar : ''बारामतीच्या विकासाकडे राजकारणापलिकडे पाहिले पाहिजे. राजकारणात हेवेदावे असतात. परंतु शेती आणि शेतकऱ्यांचा विषय पुढे आल्यास माझ्यासह कोणीही राजकारण आणू नये. त्यामुळे मी शेतकरी म्हणून बारामतीला आलो आहे.''

''राजकारणातील पवार साहेब, अजितदादा, सुप्रिया सुळे असो अथवा शेतीशी निगडीत काम करणारे राजेंद्र पवार असो, ते अपापल्या क्षेत्रात परिपुर्ण आहेत. त्यांची देशात राज्यात पाॅवर आहे आणि ती यापुढेही कायम राहील'', असे म्हणत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पवारांचे कौतुक केले आहे.

बारामती-शारदानगर येथील कृषिक प्रदर्शन पाहण्याच्या निमित्ताने अब्दुल सत्तार हे आले असता ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रॅस्टचे राजेंद्र पवार, सीईओ निलेश नलावडे उपस्थित होते. तर अब्दुल सत्तार यांनी मध्यतरी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची बारामतीमधील नरमाईची भूमिका उपस्थितांचे लक्षवेधून घेते. 

''महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या सारखी राज्यात चार विद्यापीठे सरकारी आहेत. वास्तविक कृषी क्षेत्रात महाराष्ट्र वगळता इतर राज्यात खासगी विद्यापीठे कार्यरत आहेत. त्या धर्तीवर बारामतीचा विचार होऊ शकतो'', असे सांगून मंत्री सत्तार यांनी बारामतीचे कृषी प्रदर्शन चाकोरीपलीकडचे जिवंत प्रदर्शन असल्याचे सांगितले.

''बारामतीमध्ये शेतीशी निगडीत खागजी विद्यापीठ निर्माण करण्याईतपत अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रॅस्टचे उत्तम काम आहे. येथे आवश्यक पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. मी कृषी मंत्री या नात्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की, राहुरी विद्यापीठासारखे बारामतीला अॅग्रीकल्चरल ट्रस्टच्या माध्यमातून खासगी विद्यापीठ देणे गरजेचे आहे.

जेणेकरून येथे शिक्षण, शेती आणि संशोधनाच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याला अधिक पाठबळ मिळू शकेल. त्यामुळे कोणतेही राजकारण न आणता विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून मी स्वतःहा बारामतीला विद्यापीठ निर्माण होण्यासाठी प्रयत्न करेल'', असे आश्वासन कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी दिले.

''अॅग्रीकल्चरल ट्रस्टचे आजवरचे कार्य मी व माझ्या अधिकाऱ्यांनी पाहिले. अनुभवले आणि अभ्यासलेही. जगातील नवनवे तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरता येईल, याची खात्री शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी कृषिक प्रदर्शन महत्वपूर्ण ठरत आहे. कृषिक प्रदर्शन, भिमथडी सारखे उपक्रम महिलांसह शेतकऱ्यांची अर्थिकदृष्ट्या उन्नती करण्यासाठी खूप महत्वाचे ठरत आहे.

खरेतर विदर्भ, मराठवाडा आदी भागात विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी असे उपक्रम राबविण्यासाठी राजेंद्रदादांनी (पवार) यांनी अॅग्रीकल्चरल संस्थेमार्फत प्रय़त्न करावेत आम्ही शासनस्तराव त्यांना मदत करण्यास तयार आहे'', असेही मत सत्तार यांनी मनमोकळेपणाने बोलून दाखविले.

दरम्यान, ''बारामतीत भरलेलं कृषी प्रदर्शन पाहून मी भारावून गेलो आहे, हे कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील शेतकऱ्यांनी पाहायला हवे'', असे सत्तार यावेळी म्हणाले. तसेच सत्तार यांनी बारामतीत पवारांचे कौतुक केल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT