Sharad Pawar, Ajit Pawar, Manikrao Kokate Sarkarnama
पुणे

Manikrao Kokate News : दादांना जे कळतं ते कुणालाच कळत नाही..! शरद पवारांसमोरच माणिकराव कोकाटेंनी साधली संधी

Sharad Pawar Ajit Pawar Baramati Krushik Agri Expo : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये कृषिक या कृषी प्रदर्शनाला सुरूवात झाली.

Rajanand More

Pune : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज बारामती उपमुख्यमंत्री अजित पवारांचे तोंडभरून कौतुक केले. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. मंत्रिपदाची अपेक्षा नसताना दादांनी आपल्याला कृषी मंत्री केल्याचे सांगताना कोकाटे यांनी दादांना जे कळतं ते कुणालाच कळत नाही, असे विधान केले.

कृषी विज्ञान केंद्रातर्फे बारामतीमध्ये आयोजित कृषिक कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठीवर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, अ‍ॅग्रिकल्चिर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, ट्रस्टचे विश्वस्त व सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतान कोकाटे यांनी मंत्रिपदाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, दादा मला कृषी खाते देतील, अशी अपेक्षा नव्हती. मी मंत्रिपदही मागितलं नाही, खातंही मागितलं नाही. पण दादांना जे कळतं ते कुणालाच कळत नाही, असं मला वाटायला लागलं आहे. एवढं हुशार व्यक्तिमत्व बारामतीत आहे.

रस्ते, प्लॅनिंग... जणू सिंगापूरमध्ये आल्यासारखं वाटतं. इतकं सुंदर शहर दादांनी नटवलं आहे. त्यांच्याच अवलोकन करण्याचा प्रयत्न राजकारणात आमच्यासारख्या लोकांनी केला पाहिजे. आपला स्वार्थ जनतेच्या हितामध्ये आहे. जनतेला सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यासाठीच आपण राजकारण करतो. तीच भूमिका घेऊन आमच्या सर्वांची इच्छा आहे, असे कोकाटे यांनी सांगितले.

कृषीरत्न पुरस्कार घ्या...

राजेंद्र पवार यांना 2021 मध्ये राज्य सरकारचा कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. पण त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. आज कोकाटे यांनी पुन्हा एकदा या पुरस्काराची आठवण काढत राजेंद्र पवारांना पुरस्कार स्वीकारण्याची विनंती केली.

कोकाटे म्हणाले, काही राजकीय वादग्रस्त मुद्द्यांमुळे ते पुरस्काराला गेले नाहीत. कृषी खात्याच्या वतीने तो पुरस्कार अजूनही पेंडिंग आहे. मी त्यांना जाहीर निमंत्रण देतो, सोयीची वेळ कळवा, आम्ही पुरस्कार देऊ इच्छितो. या पुरस्कारासाठी तुम्ही योग्य आहात. योग्य व्यक्तीला हा पुरस्कार मिळत आहे. राज्य सरकार तुम्हाचा गौरव करू इच्छित आहे, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT